प्रियदर्शनी सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांचा दहावीच्या निकालात डंका 

शाळेच्या  विद्यार्थ्यांनी काही विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. श्रेयश इंगोले, प्राची दुसाने, सुप्रिया जागडे, निशांत पाटील यांनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत.

प्रियदर्शनी सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांचा दहावीच्या निकालात डंका 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरीने आपली वेगळी वेगळा निर्माण करणाऱ्या भोसरी-इंद्रायणी नगर (Bhosari-Indrayani Nagar)येथील प्रियदर्शनी स्कूलने  (Priyadarshani School) निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. प्रियदर्शनी सीबीएसईचा दहावीचा निकाल (10th Cbse Result) या वर्षीही शंभर टक्के लागला असून शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत चमकदार कामगिरी केली आहे.सियोना घाटे (SIona Ghate) या विद्यार्थीनीने  96.80 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.                    

प्रियदर्शनी शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली असून श्रेयस इंगोले याने 96.60 गुण मिळवत शाळेत द्वितीय क्रमांक तर अद्वैत सातकर याने 95.80 टक्के गुण घेत शाळेत तिसरा क्रमांक मिळवला आहे.शाळेच्या  विद्यार्थ्यांनी काही विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.श्रेयश इंगोले,प्राची दुसाने, सुप्रिया जागडे, निशांत पाटील यांनी संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत.तर श्रेयस इंगोले याने सोशल सायन्समध्ये 100 पैकी 100 आणि अद्वैत सातकर यांने आयटी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत.शाळेच्या 16 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असून 65 विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन मिळवले आहे.तर 21 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून 13 विद्यार्थी प्रथम श्रेणीच्या खाली आहेत. 

 प्रियदर्शनी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.गायत्री जाधव व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे दहावीच्या 115 विद्यार्थ्यांनी निकालात चमकदार कामगिरी केली. शाळेच्या संस्थापक सचिव तरुणा सिंग,व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.राजेंद्र सिंग,नरेंद्र सिंग यांच्यासह ॲकॅडमिक हेड डॉ.नीलम मूलचंदाणी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तर प्रियदर्शनी शाळा (एसएससी बोर्ड) प्राचार्या अर्पिता दीक्षित यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

--------------------------

शिक्षक व विद्यार्थी यांनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीमुळे दहावीचा निकाल दरवर्षाप्रमाणे यंदाही चांगला लागला आहे. तसेच प्रियदर्शनी स्कूलने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे परीक्षेतील उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन.
-  डॉ.राजेंद्र सिंग, व्यवस्थापकीय विश्वस्त,  प्रियदर्शनी स्कूल