SPPU : विद्यापीठाचा युवा गौरव पुरस्कार दिग्दर्शक, निर्माता मकरंद माने यांना जाहीर 

अभिमन्यू पुराणिक, प्रणिता सोमण, ज्ञानेश्वर जाधवर यांना पुरस्कार जाहीर 

SPPU : विद्यापीठाचा युवा गौरव पुरस्कार दिग्दर्शक, निर्माता मकरंद माने यांना जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) येत्या १० फ्रेबुवारीला ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराची घोषणा करण्यात आली. विद्यापीठातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हे पुरस्कार वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात (Anniversary event)मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात.यंदाचा ‘युवा गौरव पुरस्कार’ (Yuva Gaurav Award)चित्रपट दिग्दर्शक व निर्माता मकरंद मधुकर माने (Film director and producer Makarand Mane)यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

विद्यापीठाचे हे अमृत महोत्सव वर्ष असून यानिमित्त ४ व्यक्तींना २०२३ – २४ या वर्षाचा  ‘युवा गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. कला विभागातील हा पुरस्कार चित्रपट दिग्दर्शक व निर्माता  मकरंद मधुकर माने यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे  अभिमन्यू समीर पुराणिक (बुध्दिबळ) आणि प्रणिता प्रफुल्ल सोमण (रोड सायकलिंग) यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवलेल्या ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांना त्यांच्या साहित्यातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 

यासह विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी या प्रसंगी विविध पुरस्कार प्रदान केले जातात. या वर्षीचा गुणवंत शिक्षकेतर सेवा पुरस्कार प्रशासन शिक्षकेतर कक्षातील कर्मचारी  दत्तारम दगडु जाधव यांनी जाहीर झाला आहे. तर ‘दिवंगत सुरेश भिकाजी वाघमारे गुणवंत कर्मचारी पुरस्कार’ हा प्रशासन शिक्षकेतर कक्षातील सहायक कक्षाधिकारी वर्षा सुरेश मुंढे, सतिश सर्जेराव आंधळे यांना देण्यात येणार आहे. तसेच ‘कै. व. ह. गोळे पुरस्कार’ जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रातील कर्मचारी विलास भिकू मल्हारी यांना जाहीर झाला आहे.