SPPU NWES : विद्यापीठ व परिसरामध्ये शांतता राखण्याचे आवाहन

विद्यार्थी, नागरिक, संस्था, संघटना व समाजातील सर्व घटकांनी आपले विचार, मत, भावना व्यक्त करताना विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज करताना कोणताही व्यत्यय/अडथळा येणार नाही आणि विद्यापीठाचे शैक्षणिक वातावरण चांगले राहील, याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करावा,

SPPU NWES : विद्यापीठ व परिसरामध्ये शांतता राखण्याचे आवाहन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) शैक्षणिक विभागांमध्ये शैक्षणिक सत्र सुरु असल्याने त्यांच्या शैक्षणिक कामकाजामध्ये तसेच विद्यापीठातील प्रशासकीय कामकाजामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, ही आपणा सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. त्यामुळे विद्यार्थी, नागरिक, संस्था, संघटना व समाजातील सर्व घटकांना विद्यापीठामार्फत, विद्यापीठ व परिसरामध्ये शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे, याबाबतचे जाहीर प्रकटन विद्यापीठातर्फे प्रसिध्द करण्यात आले आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांना इंटर्नशिप बंधनकारक ; श्रेयांकासाठी इंटर्नशिप सेलची कार्यपध्दती प्रसिध्द

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललितकला केंद्र (गुरुकुल) विभागामधील घटनेनंतर पोलीस प्रशासनामार्फत कायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. तसेच विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाने सदर घटनेची गंभीर दखल घेतली असून निवृत्त जिल्हा न्यायाधिशाचे अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती तात्काळ नेमण्यात आली आहे. या संबंधात विद्यापीठाकडून आवश्यक त्या सर्व कार्यवाही करण्यात येत आहे. विद्यार्थी, नागरिक, संस्था, संघटना व समाजातील सर्व घटकांनी आपले विचार, मत, भावना व्यक्त करताना विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज करताना कोणताही व्यत्यय/अडथळा येणार नाही आणि विद्यापीठाचे शैक्षणिक वातावरण चांगले राहील, याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करावा,असेही आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. 

ललित कला केंद्रात सादर झालेल्या नाटकावरून समाजात वाद निर्माण झाला. काही विद्यार्थी संघटना व राजकीय पक्षांनी यावर आक्षेत घेत आंदोलन केले.त्यानंतर विभाग प्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले. तसेच विद्यापीठाच्या मालमत्तेची तोंड फोड केली.या पार्श्वभूमीवर विद्यापीठातर्फे हे प्रकटन प्रसिध्द करण्यात आले आहे.