संचमान्यतेत तांत्रिक घोळ; शिक्षकांचे समायोजन अन् भरतीही रखडणार

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पदभरतीची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, सध्या केवळ पात्र उमेदवारांकडून स्व-प्रमाणपत्र भरून घेण्यात आली आहे.

संचमान्यतेत तांत्रिक घोळ; शिक्षकांचे समायोजन अन् भरतीही रखडणार
Teachers Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण विभागाने (Education Department) शिक्षक पदभरतीची (Teachers Recruitment) प्रक्रिया सुरू केली असली तरी अजून संचमान्यताच पूर्ण झाली नसल्याने ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. त्यातच संचमान्यतेमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने नवी समस्या निर्माण झाली आहे. संचमान्यतेच्या प्रणालीमध्ये पटसंख्या कमी-जास्त असणे, शिक्षकांची संख्या पटसंख्येवर आधारीत नसणे, विद्यार्थी संख्या कमी दाखविणे, अशा तांत्रिक चुका झाल्याचे समोर आले आहे. याबाबत शिक्षण संचालकांनी (Education Director) नॅशनल इन्फॉरमॅटिक्स सेंटर (NIC) ला पत्र पाठवून या चुका दुरुस्त करण्यास सांगितले आहे.

 

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पदभरतीची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, सध्या केवळ पात्र उमेदवारांकडून स्व-प्रमाणपत्र भरून घेण्यात आली आहे. त्याची मुदत नुकतीच संपली आहे. लाखो उमेदवारांनी नोंदणी केली असून आता सगळ्यांचे लक्ष भरती प्रक्रिया प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे लागले आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या गावी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’

 

शिक्षक भरतीसाठी संचमान्यता होणे महत्वाचे आहे. संचमान्यता झाल्याशिवाय रिक्त जागांचा आकडा समोर येणार नाही. हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाईल. त्यानंतरच शिक्षक भरतीला सुरूवात होईल. पण काही जिल्ह्यांमध्ये संचमान्यतेचे काम रखडले आहे. तर तांत्रिक चुकाही आता समोर आल्या आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी नवीन वर्ष उजाणकार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

दरम्यान शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी एनआयसीला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातून जिल्हा परिषद, मनपा क्षेत्रातील जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांच्या संचमान्यता दुरुस्तीसाठी प्रस्ताव प्राप्त होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पदसंख्या कमी-जास्त असणे, पटसंख्या असूनही शिक्षकांची संख्या पटसंख्येवर आधारीत दिसत नाही, तसेच पटसंख्या व खोलीच्या संख्या पर्याप्त असतानाही शिक्षक त्या-त्या प्रमाणात मंजूर न झाल्याचे प्रस्तावामध्ये नमूद केले आहे.

अकरावी प्रवेशाची अंतिम फेरी बुधवारपासून

 

विद्यार्थी संख्या पुरेशी असूनही विद्यार्थी संख्या एक किंवा शून्य असणे, संच मान्यतामध्ये कमी वा शिक्षक पदे दिसत नाहीत, अशाही तक्राही आहे. या तक्रारी तांत्रिक स्वरुपाच्या असल्याने याप्रकरणी आपल्या स्तरावरून पडताळून योग्य विद्यार्थी संख्येची माहिती संच मान्यता प्रणालीमध्ये उपलब्ध करून द्यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 

त्याचप्रमाणे शरद गोसावी यांनी सर्व विभागीय उपसंचालक व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनाही याबाबत सुचना दिल्या आहेत. एनआयसी यांना दुरुस्तीबाबत निर्देश दिले आहेत. ज्या शाळांच्या संचमान्यता सुधारीत करणे आवश्यक आहे, अशा सुधारीत संचमान्यता दुरुस्ती होईपर्यंत लोकल बॉडी अंतर्गत असलेल्या त्या शाळांबाबत शिक्षकांचे समायोजन तूर्त करू नये, असे गोसावी यांनी पत्रात म्हटले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k