अकरावी प्रवेशाची अंतिम फेरी बुधवारपासून 

अकरावी प्रवेशाची अंतिम फेरी बुधवारपासून 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे व पिंपरी चिंचवड (Pune and Pimpri Chinchwad) परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी (11th admission) ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून प्रवेशाची सातवी विशेष व प्रवेशाची अंतिम फेरी  (final round) बुधवारपासून सुरू होणार आहे. या  फेरीनंतर पुन्हा ऑनलाईन फेरी घेतली  जाणार नाही. तसेच ही फेरी अंतिम असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करता येणार नाही.

हेही वाचा : मोठी अपडेट : दहावी-बारावीच्या परीक्षेला वर्षातून दोनदा बसण्याची गरज नाही!

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. प्रवेशासाठी नोंदणी करणे गरजेचे असून प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी या फेरीमध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांना आपला पसंती अर्ज पुन्हा लॉक करावा लागणार आहे. येत्या ११ ते १३ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा पहिला व दुसरा भाग भरता येईल.

शिक्षण विभागातर्फे १४ व १५ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करून समित्यांकडून तपासली जाईल. येत्या १६ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांची प्रवेशाची निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थी १६  ते १७ ऑक्टोबर या कालावधी त कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करू शकातील. या कालावधीत कोटा प्रवेश व द्विलक्षी प्रवेश समांतरपणे सुरू राहतील, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.