शिक्षक भरती अपडेट : उमेदवारांनी चुकीचे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत; शिक्षण विभागाचे आवाहन 

आरक्षणाची पदे रिक्त असतील तर अशी रिक्त पदे अन्य माध्यमासाठी वर्ग करता येत नाहीत.

शिक्षक भरती अपडेट : उमेदवारांनी चुकीचे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत; शिक्षण विभागाचे आवाहन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment)उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे चुकीचे प्राधान्यक्रम (Wrong priorities)जनरेट होत असतील तर उमेदवाराने असे चुकीचे प्राधान्यक्रम लॉक करू नयेत.उमेदवारांना पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसतील अशा उमेदवारांनी दिनांक ५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रामध्ये नोंद केलेली माहिती पडताळून पहावी. तरीही पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्यास विभागाने दिलेल्या ईमेलवर थोडक्यात मेल पाठवावा.त्यामध्ये उमेदवाराने परीक्षा क्रमांक व नाव (Exam Number and Name)आवर्जुन नोंद करावे.  शिक्षण विभागाच्या ईमेलवरील (Education department email)प्राप्त होणा-या मेलला योग्य उत्तरे दिली जात आहेत.तसेच ईमेलची संख्या जास्त असल्याने उत्तर प्राप्त होण्यासाठी उमेदवारांनी काही काळ  प्रतिक्षा करावी,असे आवाहन शिक्षण विभागातर्फे (Education Department)प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

इयत्ता ६ वी ते ८ वी आणि इयत्ता ९ वी ते १० वी गटातील भाषा विषयासाठी अर्हतधारक उमेदवाराने ज्या भाषा विषयातून पदवी प्राप्त केली असेलतसेच इयत्ता ११ वी ते १२ वी या गटातील पदांसाठी ज्या भाषा विषयातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असेल अशा उमेदवारांना सर्व माध्यमांच्या व्यवस्थापनांचे त्या त्या भाषा विषयाचे प्राचान्याक्रम जनरेट होत आहेत. त्यामुळे अशा उमेदवारांनी असे प्राधान्यक्रम लॉक करण्यास हरकत नाही.

दरम्यान , २०१७ च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार २०१९ मध्ये पदभरती करताना शासन पत्र दिनांक २२/०२/२०१९ नुसार ज्या जिल्हा परिषदांकडे अनारक्षित प्रवर्गाच्या जागा जाहिरातीसाठी उपलब्ध नाहीत. तेथे पदभरती करताना ५० टक्के पदभरती करण्याचे शासन निर्देश होते. त्यानुसार तत्कालिन परिस्थितीत ती कार्यवाही झाली आहे. यावाचत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका क्रमांक ६७०१/२०१९ दाखल असून ती सध्या प्रलंबित आहे. यास्तव सद्यःस्थितीत याबाबत कार्यवाही करता येत नाही.

बिंदुनामावल्या माध्यम निहाय ठेवण्यात येतात व त्यानुसार पोर्टलवर बिंदुनामावत्त्यांमधील रिक्त पदासाठी संबंधित व्यवस्थापनांकडून जाहिराती देण्यात येतात. त्या त्या माध्यमातील अर्हताधारक उमेदवार अशा रिक्त पदांसाठी पात्र असतात. त्यामुळे एका माध्यमातील रिक्त पदे अन्य माध्यमासाठी वर्ग करता येत नाहीत. उदा. उर्दू माध्यमाच्या जाहिरातीतील काही आरक्षणाची पदे रिक्त असतील तर अशी रिक्त पदे अन्य माध्यमासाठी वर्ग करता येत नाहीत,असेही शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.