दस्तुर शाळेचे स्पेलिंग बी आणि हँडरायटिंग ऑलिंपियाडमध्ये यश
विझ आंतरराष्ट्रीय स्पेल बी आणि हँडरायटिंग विझार्ड्सच्या पुणे समन्वयक धर्मेंद्र सिंग आणि दिलप्रीत कौर यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या अतुलनीय यशाबद्दल दस्तर शाळेचे अभिनंदन केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सरदार दस्तुर नौशेरवान गर्ल्स हायस्कूलच्या अदीबा अशफाक मुजाहिदने राष्ट्रीय स्तरावरील विझ स्पेल बी स्पर्धेत तिसरा क्रमांक प्राप्त केला. तर सरदार दस्तुर होर्माझडियार हायस्कूलच्या काविन रामराज गौंडरने विझ नॅशनल हँडरायटिंग ऑलिंपियाडमध्ये सहावा क्रमांक पटकावला.
विझ आंतरराष्ट्रीय स्पेल बी आणि हँडरायटिंग विझार्ड्सच्या पुणे समन्वयक धर्मेंद्र सिंग आणि दिलप्रीत कौर यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या अतुलनीय यशाबद्दल दस्तर शाळेचे अभिनंदन केले. पुरस्कार वितरण गोवा येथे आयोजित कार्यक्रमात नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाचे अतिथी डॉ. शेखर एस. सालकर (ऑन्कोलॉजिस्ट आणि प्रेसिडेंट - नोट) आणि भुवनेश शेट (डायरेक्टर, जय भुवन ग्रुप) होते.
विझ ही संस्था राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करते. ही स्पर्धा पुण्याच्या शाळांमध्ये आयोजित केली जाते. ज्यामध्ये गुरु नानक पब्लिक स्कूल, सिटी वर्ल्ड स्कूल, सेंट व्हिन्सेंट प्राथमिक शाळा आणि इतर अनेक समाविष्ट आहेत. या शाळा विद्यार्थ्यांना या प्रतिष्ठित व्यासपीठावर शोध घेण्याचे आणि उत्कृष्टता साधण्याच्या संधी देतात. या स्पर्धेत दस्तूर मधील 38 विद्यार्थ्यांनी विझ स्पेल बीच्या राष्ट्रीय स्तरावर पात्रता प्राप्त केली, ज्यामध्ये दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तराच्या हँडरायटिंग स्पर्धेमध्ये विशेष यश मिळवले.
२०२३-२४ शैक्षणिक वर्षापर्यंत विझ नॅशनल ओळखले जाणारे विझ इंटर नॅशनल हे आता १६व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या वर्षी २०२४-२५ राष्ट्रीय स्तरापलीकडे विस्तार आहे.अदीबा अशफाक मुजाहिद आता टेक्सास यूएसमध्ये आयोजित वर्ल्ड स्पेल बी चॅम्पियनशिपसाठी सहभागी होत आहे.