विद्यार्थ्यासमवेत आपले उपक्रम राबवतो तोच खरा आदर्श शिक्षक
पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या निळू फुले सभागृहात राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार व उपक्रमाचे मुक्त आकाश पुस्तकाचे प्रकाशन पुणे महानगरपालिकेच्या उपप्रशासन प्रमुख शुभांगी चव्हाण मॅडम तथा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सोमनाथ वाळके यांच्या हस्ते करण्यात आले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
जो वर्गामध्ये विद्यार्थ्यासमवेत आपले उपक्रम राबवतो तोच खरा आदर्श शिक्षक आहे.आपण कोणत्याही फळाची अपेक्षा न करता शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवत हे महत्वाचे आहे.तसेच खऱ्या अर्थानं या पुस्तकांमध्ये तुम्ही सर्व शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमाचा संग्रह फक्त तुमच्यापुरता मर्यादित न राहता सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांना प्रेरणादायी ठरेल, असे मत राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सोमनाथ वाळके यांनी केले.
पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या निळू फुले सभागृहात राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार व उपक्रमाचे मुक्त आकाश पुस्तकाचे प्रकाशन पुणे महानगरपालिकेच्या उपप्रशासन प्रमुख शुभांगी चव्हाण मॅडम तथा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सोमनाथ वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. उपक्रमशील शिक्षक समूह महाराष्ट्र राज्यातील उपक्रमशील 62 शिक्षकांनी वर्गात राबवलेल्या उपक्रमाचा संग्रह या पुस्तकात करण्यात आलेला आहे.
पुणे येथील गायत्री शितोळे, स्वाती डहाळे ,वसुंधरा नाईक, स्नेहल पाटोळे ,सुजाता जाधव, सोलापूर मधील रजिया इस्लाम जमादार नागनाथ विष्णू घाटोळे ,पल्लवी बहिरट ,वनिता जाधव , मुंबई मधील कल्याणी दत्तात्रय मोरे, भाग्यश्री संजय पवार, तर अहिल्यानगर मधील गावडे उषा बापूराव, नाशिक मधील माधुरी तुषार पवार ,साताऱ्यातील स्वाती हनुमंत जाधव, धुळ्यातील रुखमा माहरू पाटील, बीड मधील गायकवाड रोहिणी दत्तात्रय आदी शिक्षकांना राज्यस्तरीय उपक्रमशील पुरस्कार देण्यात आला. या सर्व उपक्रमातील उपक्रमातून राजेंद्र ग्यानसिंग पावरा अनुदानित प्राथमिक शाळा तलावडी नंदुरबार या जिल्ह्यातील वड पावर या उपक्रमासाठी राजेंद्र गैन्सिंग पावरा यांना सर्वोत्तम राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला.
पुणे महानगरपालिकेच्या प्रशासन अधिकारी शुभांगी चव्हाण यांनी सांगितले की, वीनखऱ्या अर्थाने माझ्या शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांचा व संग्रह पुस्तकांचा मला सार्थ अभिमान आहे. या पुस्तकातून आपण आपले विद्यार्थी मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न मला दिसून येत आहेत,असेच आपण न नपक्रमाचा आणि वीन उपक्रम राबवले आणि आपले विद्यार्थी सर्व गुणसंपन्न कसे होतील हे पहावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक उपक्रम समूहाचे सर्वेसर्वा आयुब शेख यांनी केले. या पुस्तकाचे संपादन संजय घोडके, स्नेहल पाटोळे व विजय माने यांनी केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी नीलिमा सोनवणे, वैशाली काळे, जयश्री जायभाये, संगीता पाटील ,अर्चना डमाळे, शिंदे मॅडम यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाची तांत्रिक बाजू व नियोजन बंदावणे सोपान सर व श्रीकांत देवकर सर यांनी सांभाळली.
eduvarta@gmail.com