विधी समुपदेशन शिबिरातून विविध विषयावर मार्गदर्शन

या शिबिरात समाजातील विविध घटकातील लाभार्थीना कौटुंबिक, स्थावर मालमत्ता, कामगार विषयक, रेरा संबधित कायद्याचे समुपदेशन करण्यात आले.

विधी समुपदेशन शिबिरातून विविध विषयावर मार्गदर्शन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई- चेंबूर येथील विवेकानंद शैक्षणिक संस्थेच्या विधी महाविद्यालयात शनिवारी (दि.1) विनामूल्य विधी सेवा केंद्र आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत विधी समुपदेशन शिबिर (Free Legal Counseling Camp) चे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात समाजातील विविध घटकातील लाभार्थीना कौटुंबिक, स्थावर मालमत्ता, कामगार विषयक, रेरा संबधित कायद्याचे समुपदेशन करण्यात आले.

विवेकानंद शैक्षणिक संस्थेच्या विधी महाविद्यालयातील शिबिरात ॲड. अनूप पाल, ॲड. असिफ शेख, ॲड.प्रथमेश बनकर, ॲड. राजुराम कुलेरिया, ॲड.देव तेजनानी, ॲड.अपेक्षा सिंघ, ॲड.अनुराग सक्सेना, ॲड रविकांत पुरोहित, ॲड.अक्षता ठाकुर,ॲड.सुजाता शेलार यांनी समुपदेशन केले.

शिबिर यशस्वी होण्यासाठी विवेकानंद विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.स्वप्निल चौधरी प्रा.दिपाली बाबर, प्रेरणा भंडारी आणि तेजस मायेकर तसेच विद्यार्थी परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि संपदा जाधव, नेहा पदीयार, सुमित शेट्टी,ओंकार, गार्गी जोशी, जान्हवी वाधवानी आणि सुरेखा चौधरी यांनी नियोजन केले.