नोकरीची सुवर्णसंधी; या वर्षातील दुसरा रोजगार मेळावा बुधवारी, सहभागासाठी अशी करा नोंदणी...

मेळाव्याअंतर्गत विविध पदांसाठी वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांची तात्काळ नोकरभरती आवश्यक आहे, अशा कंपन्यांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयात उमेदवारांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी बोलाविण्यात येणार आहे.

नोकरीची सुवर्णसंधी; या वर्षातील दुसरा रोजगार मेळावा बुधवारी, सहभागासाठी अशी करा नोंदणी...
Job Fair in Pune

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पुण्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने प्रत्येक महिन्याला रोजगार मेळावा (Job Fair) अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे (Placement Drive) आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत या वर्षातील दुसरा रोजगार मेळावा येत्या १० मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. (Skill Development Employment and Entrepreneurship Guidance Center in Pune organized a job fair on Wednesday)

मार्गदर्शन केंद्रामार्फत वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित केले जातात. त्यामाध्यमातून सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी या कार्यालयामध्येच प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : मागासवर्गीय शिष्यवृत्तीबाबत मोठी अपडेट; सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा

मेळाव्याअंतर्गत विविध पदांसाठी वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांची तात्काळ नोकरभरती आवश्यक आहे, अशा कंपन्यांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयात उमेदवारांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी बोलाविण्यात येणार आहे. या मुलाखतींना प्रत्यक्ष हजर राहून पात्र होतील, अशा उमेदवारांना लगेच जागेवरच नोकरीची संधी मिळणार आहे. 

असे होता येईल मेळाव्यात सहभागी

अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नोंदणी नसल्यास प्रथम आपली नावनोंदणी करावी आणि होमपेजवरील नोकरीसाधक (जॉब सीकर) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. उमेदवारांनी लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्ड मधील ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या बटनावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील ‘2nd  PLACEMENT DRIVE-PUNE’ या रोजगार मेळाव्याची निवड करावी.

उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन उचित असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवावा. ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवारी म्हणजेच १० मे रोजी समक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आपल्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2