दिल्लीतील कॉलेजच्या 100 विद्यार्थ्यांचे निलंबन ; कारण ऐकून वाटेल आश्चर्य

कॉलेजमधून काढून टाकण्याची व परीक्षेला बसण्यापासून रोखण्याची धमकी देण्यात आली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

दिल्लीतील कॉलेजच्या 100 विद्यार्थ्यांचे निलंबन ; कारण ऐकून वाटेल आश्चर्य

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

दिल्ली विद्यापीठाअंतर्गत (University of Delhi) येणारे सेंट स्टीफन्स काॅलेज (St. Stephen's College) सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे काॅलेज प्रशासनाकडून एक-दोन नाही तर तब्बल १०० पेक्षा अधिक विद्याथ्यांचे निलंबन (Suspension of 100 students) करण्यात आले आहे. तास बंक करणे, प्रॉग्जि, असेंबलीला गैरहजर राहणे ही चुक काही विद्यार्थ्यांना महागात पडली आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलल्यानंतर पुढील कारवाई काॅलेजकडून करण्यात येणार आहे. 

विद्यार्थ्यांनी पालकांना  फोन करून कॉलेजमध्ये न बोलवल्यासा त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्याची व परीक्षेला बसण्यापासून रोखण्याची धमकी देण्यात आली आहे.  तर कॉलेजने निलंबनाचा आदेश तात्काळ मागे घेऊन कॉलेजची परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थी व काही शिक्षकांनी प्राचार्य जॉन वर्गीस यांना पत्र लिहून केली आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून या प्रकरणावर काहीही  प्रतिक्रिया आलेली नाही. 

प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना 17 फेब्रुवारी रोजी ईमेलद्वारे या संदर्भात माहिती मिळाली होती. दिल्ली विद्यापीठाच्या नियमांमध्ये असा कोणताही नियम नाही, ज्या अंतर्गत विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखले जाऊ शकते. मॉर्निंग असेंबली हे केवळ सेंट स्टीफन कॉलेजचे अधिवेशन आहे आणि त्याला विद्यापीठाची मान्यता नाही, असा युक्तीवाद विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांच्या बाबतीत काॅलेज प्रशासन काय निर्णय घेईल,  हे पाहाणे महत्ताचे ठरणार आहे.