विद्यार्थ्यांचे हॉल तिकिट रोखता येणार नाही ; मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टच सांगितले 

यंदा 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहेत.मागील वर्षांच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या वाढली आहे.

विद्यार्थ्यांचे हॉल तिकिट रोखता येणार नाही ; मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टच सांगितले 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षा देण्यापासून एकाही विद्यार्थ्याला वंचित ठेवता येणार नाही.तसेच शुक्ल भरले नाही (Fee not paid)म्हणून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट (Hall Ticket) रोखता येणार नाही. राज्य मंडळाकडे आशा दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.संबधित गट शिक्षण शिक्षण अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकिट उपलब्ध करून देणे अपेक्षित आहेत. मात्र, एखादी शाळा विद्यार्थ्याला परीक्षेपासून वंचित ठेवत असेल तर संबंधित शाळेविरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल,असा स्पष्ट इशारा राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (State Board of Education Chairman Sharad Gosavi)यांनी सांगितले. तसेच बुधवारपासून (दि.21)सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमातून नऊ विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांची इयत्ता बारावीची परीक्षा येत्या 21 फेब्रुवारीपासून घेतली जाणार आहे.याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित परीक्षा परिषदेत शरद गोसावी बोलत होते. ते म्हणाले, शाळेचे शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवता येत नाही.तसे केल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाते .दरम्यान, यंदा 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहेत.मागील वर्षांच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या वाढली आहे.फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 56 हजार 616 एवढी वाढली आहे.

गोसावी म्हणाले, मागील वर्षी 34 हजार विद्यार्थ्यांनी 17 नंबरचा अर्ज भरून परीक्षा दिली होती.यंदा त्यात 39 हजार 587 ने वाढ झाली आहे. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर बैठे पाठक ठेवण्यात आले आहे.तसेच महसूल व पोलसी प्रशासनांकडूनही परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नियोजित वेळेत हजर राहणे आवश्यक आहे.दिलेल्या वेळेनंतर परीक्षाकेंद्रावर न येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.