धक्कादायक : निवासी शाळेत १४ वर्षीय मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार; रक्षकच बनले भक्षक..

याप्रकरणी वसतिगृह अधिक्षक, संस्थाचालक, सचिव, मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. 

धक्कादायक : निवासी शाळेत १४ वर्षीय मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार; रक्षकच बनले भक्षक..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना (Shocking incident in Chandrapur district) घडली आहे. शहरात असलेल्या एका निवासी मूकबधिर शाळेत (Residential Deaf School) १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार (A 14-year-old student was molested) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटनेचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेतील महिला शिक्षिका आणि शिक्षकाने याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी वसतिगृह अधिक्षक, संस्थाचालक, सचिव, मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. 

या प्रकारणी कलम ३५४, ३५४ बी, १०९, पोक़्सो कलम १०, १७, २१, ८, ९ एफ, ९ अंतर्गत ॲट्रॉसिटी कायदा १९८९ चे कलम ३ (१) (डब्ल्यू) (१), ३ (१) (डब्ल्यू) (२), ३ (२) (वीए) अंतर्गत चंद्रपूर पोलीसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. वरी सर्व गुन्हांच्या आधारावर शहर पोलिसांनी  वसतिगृह अधीक्षक, संस्थाध्यक्ष, सचिव मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

वसतिगृह प्रमुख अजय वैरागडे याने वसतिगृहात एकट्या असलेल्या मूकबधिर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या चर्चेवरून शिक्षिकांना घटनेची माहिती झाली. त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. मात्र वरिष्ठांकडून सदरील प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे इतर शिक्षिका व शिक्षकांच्या लक्षात आले. त्यानंतर कोणतीही दिरंगाई न करता विद्यालयातील तीन शिक्षिका, एक शिक्षक तसेच पीडित मुलीच्या तक्रारीवरून वसतिगृह अधीक्षक तसेच घटनेचे दुर्लक्ष केल्याने मूकबधिर विद्यालयाचे प्राचार्य, सचिव व संस्था अध्यक्ष यांच्यावरही गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी शुक्रवारी वसतिगृह अधीक्षक, संस्थाध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक यांना अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी वसतिगृह अधीक्षक अजय वैरागडे यास दोन दिवसांची पोलिस कोठडी, तर संस्थाध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली.