शिक्षक बनले मतदान जनजागृतीसाठी वासुदेव; मतदान करण्याचे नागरीकांना आवाहन 

नाशिक जिल्ह्यातील एका शिक्षकाने आनोखा फंडा वापरला आहे.

शिक्षक  बनले मतदान जनजागृतीसाठी वासुदेव; मतदान करण्याचे नागरीकांना आवाहन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, या दोन्ही टप्प्यात  मतदान कमी झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शालेय स्तरावर शिक्षकांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) एका शिक्षकाने आनोखा फंडा (Anokha funda by the teacher) वापरला आहे. शिक्षकाने मतदान जनजागृती (Voting awareness) व्हावी यासाठी चक्का वासुदेवाची वेशभूषा (Costume of Vasudeva)  करत नागरीकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

शिक्षक हे कलेचे पाईक असतात. सध्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील अनेक शिक्षकांना सामावून घेतले आहे. तर काही शिक्षणकांना मतदार जनजागृती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दिलेली जबाबदारी पार पडण्यासाठी शिक्षक आपल्या अंगी असलेल्या कलेचा वापर करताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील एका खेडेगावातील शिक्षकाने सकाळच्या प्रहरी वासूदेवाची वेशभूषा करुन नागरीकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला . त्यातून त्याने मतदानाचे महत्व पटवून सांगितले.

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांच्या व शालेय  विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निःपक्षपातीपणे जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत. या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवावी, असे निवडणुक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवविले जात आहेत.