संतोष देशमुखांच्या मुलाचा सैनिकी शाळेत प्रवेश, फडणवीसांनी स्विकारले पालकत्व 

ही केवळ आर्थिक किंवा शैक्षणिक मदत नसून समाजात सकारात्मकता आणि माणुसकीचे मूल्य टिकवण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे. कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सदैव उभे आहोत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिचे बारावी व NEET परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल विशेष अभिनंदन केले आहे. 

संतोष देशमुखांच्या मुलाचा सैनिकी शाळेत प्रवेश, फडणवीसांनी स्विकारले पालकत्व 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कै. संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज देशमुख (Viraj Deshmukh) आणि पुतणे सत्यजित देशमुख यांचे इयत्ता ८ वी ते १२ वी (Education from 8th to 12th standard) पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाचे पालकत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी घेतले आहे. यासाठी त्यांचा प्रवेश रामरत्न एज्युकेशन फाउंडेशन संचालित एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल, (S. K. International Sainik School) रेठरेधरण, ता. वाळवा, जि. सांगली येथे निश्चित करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत म्हणाले, या मुलांना आमच्या एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये प्रवेश देऊन त्यांची जबाबदारी पार पाडण्याचा मान देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला दिला आहे. आम्ही ही जबाबदारी पूर्ण निष्ठा, काळजी आणि प्रेमाने पार पाडू आणि साहेबांनी दाखवलेल्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरू, असा शब्द आम्ही त्यांना दिला आहे.