CSIR NET साठी अर्ज करण्यास अंतिम मुदत वाढ

CSIR NET साठी अर्ज करण्यास अंतिम मुदत वाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने CSIR NET जून 2024 परीक्षेसाठी नोंदणी करण्याची आणखी एक संधी दिली आहे. CSIR NET साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत अर्ज करता आले नाहीत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी  अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट csirnet.nta.ac.in ला भेट द्यावी.
 

कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF), सहाय्यक प्राध्यापकांची भरती आणि भारतीय विद्यापीठांमध्ये पीएचडी कार्यक्रमांसाठी प्रवेश यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे  (CSIR NET 2024) आयोजन जून महिन्यात  25, 26 आणि 27 जून रोजी करण्यात आले आहे. 

ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 मे असून परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 27 मे आहे. येत्या 29 ते 31 मे 2024 पर्यंत अर्जात दुरुस्ती करण्याची संधी दिली जाणार आहे.