CA इंटरमिजिएट परीक्षेसाठी परीक्षा अर्ज भरण्यास सुरूवात

सप्टेंबर सत्राच्या परीक्षा 12 ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. तर सीए इंटर परीक्षा 12 ते 23 सप्टेंबर २०२४ या दरम्यान होणार आहे.

CA इंटरमिजिएट परीक्षेसाठी परीक्षा अर्ज भरण्यास सुरूवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सने (ICAI) सप्टेंबर 2024 सत्रासाठी (CA) इंटरमिजिएट परीक्षेसाठी परीक्षा अर्ज (Examination Application for Intermediate Examination) भरण्यास सुरूवात झाली आहे. इच्छुक उमेदवार icai.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षा फॉर्म (Exam Form) भरू शकतात. सप्टेंबर सत्राच्या परीक्षा येत्या 12 ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. तर सीए इंटर परीक्षा 12 ते 23 सप्टेंबर २०२४ या दरम्यान होणार आहे.

वेळापत्रकानुसार ICAI - CA फाउंडेशन 2024 ची परीक्षा 13, 15, 18 आणि 24 सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे. CA फाउंडेशन 2024 परीक्षा चार्टर्ड अकाउंटंटच्या नियमन 28F अंतर्गत कौन्सिलने अधिसूचित केलेल्या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या अभ्यासक्रमानुसार घेतली जाणार आहे.

सीए इंटर परीक्षा गट 1 साठी 12, 14, 17 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहे. तर गट 2 साठी  19, 21 आणि 23 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहे. तसेच 16 सप्टेंबर 2024  रोजी मिलाद उन-नबी या सणामुळे कोणतीही परीक्षा होणार नाही, असे कौन्सिलकडून सांगण्यात आले आहे. 

यासाठी उमेदवाराने 1 मे 2024 रोजी किंवा त्यापूर्वी फाउंडेशन कोर्समध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. परीक्षा फॉर्म भरल्याच्या तारखेनुसार उमेदवाराने CPT मधून फाउंडेशनमध्ये रूपांतरित केलेले असणे आवश्यक आहे. उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 12 वीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा उमेदवाराचे 12वीचे प्रवेशपत्र किंवा निकाल SSP मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटicai.org ला भेट द्यावी.  त्यानंतर लॉगिन क्रेडेंशियल्सच्या मदतीने साइन इन करावे. अर्ज भरा, ऑनलाइन शुल्क भरा. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी. फॉर्म सबमिट केल्यानंतर, भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.