शिक्षक भरती मोठी अपडेट: उमेदवार निवडीसाठीची शिफारस झाली; अशी पाहता येणार

लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल.तसेच नियुक्ती प्राधिकारी/व्यवस्थापन यांनादेखील स्वतंत्रपणे पुढील कार्यवाहीबाबत सूचना देण्यात येत आहेत.

शिक्षक भरती मोठी अपडेट:  उमेदवार निवडीसाठीची शिफारस झाली; अशी पाहता येणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची (Teacher recruitment )प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून जलद गतीने सुरू असून शिक्षण विभागातर्फे उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय तसेच विविध न्यायनिवाडे, शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे,असे शिक्षण विभागातर्फे परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत, त्यांना लॉगीन केल्यानंतर अँप्लिकेशन फॉर्म (Application Form) मेनू अंतर्गत अँप्लिकेन्ट रिकमंडेड स्टेटस (Applicant Recommended status) यावर क्लिक केल्यावर सलेक्ट राऊंड (Select Round) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून फेज-१ (Phase-1) यानंतर सलेक्ट इंटरव्हिव टाईप (Select Inteview Type) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून विदाआऊट इंटरव्हिव (without Interview) मेनू निवडावा. त्यानंतर सबमिट (submit) वर क्लिक करावे.त्यानंतर व्हिव रिकमंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट (View Recommended Institute list) या मध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास, सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल. व्हिव प्रेफरेन्स वाईस स्टेटस (View Preferencewise status) यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल.तसेच नियुक्ती प्राधिकारी/व्यवस्थापन यांना देखील स्वतंत्रपणे पुढील कार्यवाहीबाबत सूचना देण्यात येत आहेत.

हेही वाचा : शिक्षण शिक्षक भरती शिफारशीनंतरही भाषा, गणित,विज्ञान विषयासह माजी सैनिक,खेळाडूंच्या हजारो जागा रिक्त

निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच उमेदवारांच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढल्यास उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. तसेच अशा उमेदवारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.उमेदवारांच्या निवडीबाबत उमेदवारांच्या काही अडचणी असल्यास राज्यस्तरावर "तक्रार निवारण व दुरुस्ती समिती" स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी आपणासedupavitra२०२२@gmail.com या ईमेल वर सबळ पुराव्यांसहित अर्ज सादर करता येईल.

उमेदवारांना अन्य काही अडचणी आल्यास edupavitra2022@gmail.com या email वर संपर्क साधता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जात असताना अनेक असंतुष्ट घटक काहीतरी वावड्या उडवून प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, ते सर्व प्रयत्न सनदशीर मार्गाने व ठामपणे प्रशासनाने हाणून पाडले आहेत, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.