राज्यातील प्राध्यापिका बनणार ‘महिला सक्षमीकरण दूत’

 “संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे, महिला सक्षमीकरण आणि उच्च शिक्षण” हा या परिषदेचा विषय आहे. पुणे विद्यापीठात होणाऱ्या या परिषदेत राज्यातील विविध महाविद्यालयातील ५०० महिला प्राध्यापिका सहभागी होणार आहेत.

राज्यातील प्राध्यापिका बनणार ‘महिला सक्षमीकरण दूत’

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

उच्च व तंत्रशिक्षण विभाग (Higher Education Department) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) वतीने सोमवारी (दि. २३) एक दिवसीय राज्यस्तरीय महिला सक्षमीकरण (Woman Empowerment) परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत सहभागी महिला अध्यापकांना महिला सक्षमीकरण समन्वयक अथवा महिला सक्षमीकरण दूत (Ambassador for Woman Empowerment) म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे.

 

 “संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे, महिला सक्षमीकरण आणि उच्च शिक्षण” हा या परिषदेचा विषय आहे. पुणे विद्यापीठात होणाऱ्या या परिषदेत राज्यातील विविध महाविद्यालयातील ५०० महिला प्राध्यापिका सहभागी होणार आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

रोहित पवारांकडून विद्यार्थ्यांची घोर निराशा ; सिनेट सदस्य असून विद्यार्थ्यांसाठी नाही वेळ ?

 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दिवसभर दोन सत्रात होणाऱ्या या परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी महिला अध्यापकांना मार्गदर्शन करणार आहेत.

 

नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि महिला सक्षमीकरणावर’ मार्गदर्शन करणार असून महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या अंजू उप्पल या महिला अध्यापकांना प्रशिक्षण देणार आहेत. तसेच प्राचार्या डॉ. अस्मिता हुद्यार यांचे ‘समभावावर बोलू काही’ हे मार्गदर्शनपर सत्र होणार आहे.

 

न्यूझीलँड ट्रेड ॲण्ड एन्टरप्रायजेस इंडिया बिचहेडस ॲडव्हायझरचे अध्यक्ष रामानन, डॉ. प्रज्ञा सरवदे, एडीजी महाराष्ट्र पोलिस तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वरिष्ठ विधी अधिकारी ॲड. परवीन सय्यदही सहभागी महिला अध्यापकांचे मार्गदर्शन करणार आहेत. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k