सौरऊर्जेवर उजाळणार पहिली मराठी अनुदानित शाळा; विद्युत निर्मिती प्रकल्प उभारला

विद्युत निर्मिर्ती प्रकल्पाचे उदघाटन रविवारी (दि. २२) करण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ व संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन झाले.

सौरऊर्जेवर उजाळणार पहिली मराठी अनुदानित शाळा; विद्युत निर्मिती प्रकल्प उभारला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (DES) न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत (New English School Ramanbaug) सौरऊर्जेवर (Solar Energy) आधारित विद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. शाळेचे व कॉलेजचे सर्व वर्ग, शाळेचे आवार व मैदान असे सुमारे एक हजार चौरस फुट क्षेत्र या प्रकल्पामुळे उजळून निघणार आहे. दररोज जवळपास २०० युनिट वीज निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे.

 

विद्युत निर्मिर्ती प्रकल्पाचे उदघाटन रविवारी (दि. २२) करण्यात आले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ व संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन झाले. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, शाळेचे वित्त नियंत्रक डॉ. आशिष पुराणिक, प्रबंधक डॉ. सविता केळकर, सदस्य डॉ. शरद आगरखेडकर, शाला समिती अध्यक्ष  ॲड. अशोक पलांडे आदी उपस्थित होते.

असाक्षर सर्वेक्षणात महाराष्ट्राची पीछेहाट; १२ लाखांचे उद्दिष्ट, नोंदणी फक्त २७ हजार

 

'अन्शा एनर्जी सिस्टीम'चे शशांक कुलकर्णी या माजी विद्यार्थ्यांनी सोलर पॅनल चा सेटअप उभारला आहे. प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सुनील शिवले, माजी विद्यार्थी,आ जी विद्यार्थी शिक्षक-पालक यांच्या आर्थिक सहाय्यातून तसेच सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. ५१ किलो वॅट क्षमतेचा, २०० युनिट प्रतिदिन वीज निर्मिती करणारा, १५१ सोलर पॅनेल असलेला सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प शाळेचे व कॉलेजचे सर्व वर्ग, शाळेचे आवार व मैदान असा एक हजार स्क्वेअर फुट क्षेत्र सौरऊर्जा विद्युत कार्यक्षेत्रात समाविष्ट आहे.

 

रमणबाग प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून सौरऊर्जा  विद्युत निर्मिती प्रकल्प उभारणारी रमणबाग शाळा महाराष्ट्र राज्यातील पहिली अनुदानित मराठी माध्यमाची शाळा असल्याचा दावा संस्थेकडून करण्यात आला आहे. त्यासाठी अध्यक्ष शरद कुंटे यांनी माजी विद्यार्थी,मुख्याध्यापक, पदाधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर पालक व विद्यार्थी त्यांचे कौतुक केले. प्रशालेच्या शालाप्रमुख मनिषा मिनोचा यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक व भौतिक सुविधा उभारणी  मध्ये शाळा काळाच्या पुढे विचार करून पावले उचलत आहे असे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास देशपांडे यांनी केले तर आभार ब्रह्मेंद्र शेटे यांनी मानले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k