परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाचे विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन; कारवाईचे आदेश
या संदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या असे निर्देश दिले आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
गुरूच्या नावाला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. वाशी येथील एका महाविद्यालयात (college in Vashi) परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन (Supervising professor allegedly behaved inappropriately with 16-year-old student during exam) केल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत तातडीने चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Deputy Chairman of the Legislative Council Dr. Neelam Gorhe) यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना केली आहे.
या संदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या असे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणाचा तातडीने आणि निष्पक्षपणे तपास होण्यासाठी तज्ज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात यावी, तसेच आरोपीला कोणतेही पाठबळ मिळणार नाही याची काळजी घ्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, विद्यार्थिनींवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अत्याचारासंदर्भात कठोर पावले उचलली जातील आणि दोषींना कडक शिक्षा होईल, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जावी असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.