नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 9वी आणि 11वी प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ
विद्यार्थी किंवा त्यांचे पालक NVS च्या अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निवड चाचणी २०२५ मध्ये उपस्थित राहण्यासाठी फॉर्म भरू शकतात.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नवोदय विद्यालय समितीने (Navodaya Vidyalaya Samiti) इयत्ता 9 वी आणि 11वीच्या प्रवेशासाठी अर्ज (Class 9th and 11th Admission Form Exam 2025) करण्याची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवली (Application submission date extended) आहे. ज्या पालकांना आपल्या पाल्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे मात्र, ते अद्याप अर्ज करू शकले नाहीत, त्यांना आता 19 नोव्हेंबरपर्यंत संधी आहे. विद्यार्थी किंवा त्यांचे पालक NVS च्या अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने प्रवेश निवड चाचणी २०२५ (Entrance Selection Test 2025) मध्ये उपस्थित राहण्यासाठी फॉर्म भरू शकतात.
असा भरता येणार अर्ज
नवोदय विद्यालयाचा अर्ज भरण्यासाठी प्रथम navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला ज्या वर्गासाठी (9वी किंवा 11वी) अर्ज करायचा आहे त्या लिंकवर क्लिक करा. यानंतर उमेदवार नवीन पोर्टलवरील पहिल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा आता आवश्यक तपशील भरून नोंदणी करा. यानंतर स्वाक्षरी, छायाचित्र इ. अपलोड करा. आता पूर्णपणे भरलेला फॉर्म सबमिट करा. शेवटी उमेदवाराने पूर्णपणे भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यावी.
नवोदय विद्यालय समिती 8 जानेवारी 2025 रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वी साठी प्रवेश निवड चाचणी 2025 रोजी आयोजित करेल. परीक्षेत उमेदवारांकडून 100 बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न विचारले जातील. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल आणि ती सोडवण्यासाठी एकूण अडीच तासांचा वेळ दिला जाईल. परीक्षेशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.