CSIR NET जूनचा कट-ऑफ आणि रँक जाहीर

CSIR NET जून 2024 परीक्षेत बसलेले उमेदवार csirhrdg.res.in या अधिकृत वेबसाइटवरून कट ऑफ गुण आणि रॅकिंग उमेदवारांची यादी डाउनलोड करू शकतात.

CSIR NET जूनचा कट-ऑफ आणि रँक जाहीर

एज्युवार्ता न्यूज 

CSIR UGC NET जून परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) NTA ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि लेक्चरशिपसाठी (For Junior Research Fellowship and Lectureship) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (Council of Scientific and Industrial Research National Eligibility Test) CSIR-UGC-NET निकाल (Result) जाहीर केला आहे. यासह कट ऑफ आणि रॅकिंग (Cut off and racking) जाहीर करण्यात आले आहेत. CSIR NET जून 2024 परीक्षेत बसलेले उमेदवार csirhrdg.res.in या अधिकृत वेबसाइटवरून कट ऑफ गुण आणि रॅकिंग उमेदवारांची यादी डाउनलोड करू शकतात.
निकाल पाहण्यासाठी, उमेदवारांना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर निकालाची पीडीएफ त्यांच्यासमोर उघडेल. उमेदवारांची इच्छा असल्यास ते त्यानंतर निकालाची प्रिंटआउटही घेऊ शकतात.
जून 2024 साठी CSIR-UGC संयुक्त परीक्षा 25, 26 आणि 27 जुलै 2024 रोजी घेण्यात आली होती. ज्युनियर रिसर्च फेलोशिप, असिस्टंट प्रोफेसर पदासाठी आणि पीएच.डी.च्या प्रवेशासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. 1 हजार 963 उमेदवार CSIR NET जून 2024 च्या परीक्षेसाठी कनिष्ठ संशोधन फेलोशिपच्या श्रेणी 1 आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत. त्याच वेळी, जेआरएफच्या प्रवेश परीक्षेत केवळ 11 उमेदवारांना यश मिळाले आहे.