NEET PG 2024 परीक्षेचे गोपनीय दस्तावेज व्हायरल

ALL FMGs ASSOCIATION (AFA) या ट्विटर अकाउंटवर एका गोपनीय पत्राचा फोटो शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लोकांनी हा फोटो पाहिला आहे.

NEET PG 2024 परीक्षेचे गोपनीय दस्तावेज व्हायरल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET UG पेपर लिक प्रकरणानंतर सुरू झालेला वाद अजून सुरू असताना आता  NEET PG 2024 परीक्षेशी संबंधित एक नवीन वाद समोर आला आहे. या परीक्षेशी निगडीत एक गोपनीय पेपर (Confidential Papers)सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीडिया रीपोर्टनुसार  NEET परीक्षेशी संबंधित हा पेपर लीक होण्याची शक्यता आहे. NEET PG परीक्षा 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. 

ALL FMGs ASSOCIATION (AFA) या ट्विटर अकाउंटवर एका गोपनीय पत्राचा फोटो शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लोकांनी हा फोटो पाहिला आहे. NEET PG परीक्षेशी संबंधित महत्त्वाचे तपशील फोटोमध्ये दिसत असलेल्या पेपरमध्ये लिहिलेले आहेत. यामध्ये NEET PG 2024 परीक्षेच्या वेळेची माहितीही देण्यात आली आहे. त्यानुसार NEET PG परीक्षा 11 ऑगस्ट रोजी सकाळी आणि दुपारी अशा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल.

 प्रथमदर्शनी असे दिसते की NBEMS चे एक गोपनीय पत्र सार्वजनिकरित्या लीक झाले आहे, ज्यामध्ये परीक्षा शिफ्ट आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या याविषयी माहिती आहे.जर एखादे गोपनीय पत्र लीक होऊ शकते, तर आपण NEET PG पेपरच्या सुरक्षिततेबद्दल खात्री बाळगू शकतो का? असा सवाल या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.