NCHM JEE परीक्षेचा निकाल जाहीर

परीक्षेस प्रविष्ट झालेले उमेदवार exams.nta.ac.in/NCHM या अधिकृत वेबसाइटवरून निकाल डाउनलोड करू शकतात.

NCHM JEE परीक्षेचा निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नॅशनल कौन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (NCHM JEE) संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर (Joint Entrance Examination Result Declared)केला आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेले उमेदवार exams.nta.ac.in/NCHM या अधिकृत वेबसाइटवरून निकाल डाउनलोड करू शकतात.

उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून वेबसाइटवर लॉग इन करू शकतात आणि त्यांचे संबंधित स्कोअर कार्ड पाहू शकतात. उमेदवार आपले स्कोअर कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट आऊट घेऊ शकतात. NCHM JEE परीक्षा 11 मे 2024 रोजी देशभरातील 99 शहरे आणि 121 केंद्रांवर घेण्यात आली होती.

NCHMJEE निकाल असा करा डाउनलोड 

* Exams.nta.ac.in/NCHM या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
* मुख्यपृष्ठावर, “NCHM स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा” या ऑप्शन वर क्लिक करा.
* यानंतर तुमचे लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
* आता निकाल तपासा आणि डाउनलोड करा.
यानंतर भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.