NCERT ची तिसरी, सहावीची नवी पुस्तके बाजारात केव्हा येणार ; शाळा सुरू झाल्या पुस्तके केव्हा मिळणार?

पालक आणि विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा कोणतीही काळजी करू नये, असे एनसीआरटीने सांगितले आहे.

NCERT ची तिसरी, सहावीची नवी पुस्तके बाजारात  केव्हा येणार ; शाळा सुरू झाल्या पुस्तके केव्हा मिळणार?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्रीय विद्यालयासह विविध सीबीएसई बोर्डाच्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत.मात्र,अद्याप विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रीय शिक्षणिक धोरणानुसार इयत्ता तिसरी व सहावीची बादलेली पुस्तके मिळाली नाहीत.त्यामुळे विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. मात्र, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) नवीन अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता 3 री आणि 6 वी ची पुस्तके (3 and 6 class Books ) एप्रिल आणि मे मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा कोणतीही काळजी करू नये, असे एनसीईआरटीने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला मे महिन्यात पाठ्यपुस्तके जाहीर करण्याची घोषणा केली होती. शिवाय सर्व संलग्न शाळांना 2024-25 शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 3 आणि 6 साठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके वापरण्याचे निर्देश दिले होते. परंतु, शाळा सुरू झाल्या तरीही अद्याप पुस्तके मिळाले नाहीत.मात्र, आता या सर्व प्रक्रियेला वेग आला आहे. सर्वांसाठी ही पुस्तके या चालू महिन्यात आणि पुढील मे महिन्यात प्रकाशित करण्यात येणार आहे,असे एनसीईआरटीने सांगितले . 

एनसीईआरटीने स्पष्ट केले की, शालेय पुस्तके वेळेवर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. इयत्ता 1 ली, 2 री, 7 वी, 8 वी, 10 वी आणि 12 वी ची सुमारे 33 लाख पुस्तके आतापर्यंत छापली गेली असून पुस्तकांच्या दुकानात वितरित झाली आहेत. इयत्ता 3 री, 4 थी, 5 वी, 9 वी आणि 11 वी ची पुस्तके या महिन्यापर्यंत बाजारात उपलब्ध होतील, तर इयत्ता 6 वी ची पुस्तके मे महिन्यात उपलब्ध होतील, असे परिषदेने सांगितले.

नवीन अभ्यासक्रमांतर्गत दोन वर्गांसाठी पुस्तके प्रकाशित करण्याची योजना एनसीईआरटीने तयार केली आहे.  इयत्ता 3 री ची सुरुवात पूर्वतयारीची सुरुवात आहे आणि इयत्ता 6 वी ची सुरुवात मधल्या टप्प्याची सुरुवात आहे. त्यांना सुधारणे आवश्यक आहे जेणेकरून ते राष्ट्रीय अभ्यासक्रमाशी सुसंगत असतील.

नवीन अभ्यासक्रमात अखंड संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी, NCERT ने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) शी संलग्न असलेल्या शाळांसाठी इयत्ता 6 वी साठी ब्रिज प्रोग्राम आणि इयत्ता 3 री साठी संक्षिप्त मार्गदर्शक तत्त्वे देखील तयार केली होती.