स्कुल बसचा भीषण अपघात.. ४ शाळकरी मुलांचा मृत्यू , २५ विद्यार्थी जखमी

चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलटल्याने हा अपघात झाला. 

स्कुल बसचा भीषण अपघात..  ४ शाळकरी मुलांचा मृत्यू , २५ विद्यार्थी जखमी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सहलीवरून परत येत असताना एका स्कूल बसला भीषण (School bus accident) अपघात आला आहे. यामध्ये ४ शाळकरी मुलांचा मृत्यू (Death of 4 school children) झाला असून २५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी या ठिकाणी हा अपघात झाला असून सुरतगंज इथल्या शाळेतील सहलीला गेलेल्या स्कूल बसचा अपघात झाल्याने ही दूर्घघटना घडली आहे. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस उलटली. त्यामुळे हा अपघात घडला. 

दरम्यान, सहलीवरून परतत असताना भरधाव स्कूल बस उलटल्याने ही घटना घडली आहे. स्कूल बसचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. अपघात इतका भीषण होता की चार मुलांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक मुलं जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. हा अपघात उत्तर प्रदेशातील बाराबंकी परिसरात घडला आहे. 

प्राप्त माहितीनुसार,  मंगळवारी बाराबंकी इथं एक भरधाव वेगाने निघालेली बस उलटली. या अपघातात चार चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातामध्ये २५ मुलं गंभीर जखमी झाली आहेत. विकासखंड सूरतगंज इथल्या एका शाळेचे विद्यार्थी सहलीसाठी लखनऊला गेले होते. लखनऊहून परत येताना ही दुर्घटना घडली. घटनेनंतर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.