शिक्षण मंत्रालयाकडून तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अंमलबजावणी नियम प्रसिध्द

शैक्षणिक विकास सोसायटीच्या सहकार्याने तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करणे या थीमच्या माध्यमातून याला चालना देण्यात आली आहे. नव्याने प्रसिध्द करण्यात आलेलया मॅन्युअल या थीमच्या अनुषंगाने डिझाइन केले गेले आहे.

शिक्षण मंत्रालयाकडून तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अंमलबजावणी नियम प्रसिध्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जागतिक तंबाखू विरोधी दिन (WNTD) 2024 च्या निमित्ताने शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग (Department of School Education and Literacy), शिक्षण मंत्रालयाने नवी दिल्ली येथे तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था (Tobacco Free Educational Institutions) अंमलबजावणी नियमावली प्रसिध्द  (Launch of Implementation Manual) करण्यात आली. शैक्षणिक विकास सोसायटीच्या सहकार्याने तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करणे या थीमच्या माध्यमातून याला चालना देण्यात आली आहे. नव्याने प्रसिध्द करण्यात आलेले मॅन्युअल या थीमच्या अनुषंगाने डिझाइन केले गेले आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ToFEI मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात शाळांना मदत करणे, याद्वारे विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी, तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करणे हे या मॅन्युअलचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम तंबाखूच्या धोक्यांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब आणि अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधितांना सक्षम करेल, असा आशावाद बाळगण्यात आला आहे. 

सर्व शैक्षणिक संस्थांनी तंबाखूच्या वापरास परावृत्त करण्यासाठी पावले उचलावीत आणि शैक्षणिक संस्थांना तंबाखू बनवून मुलांना तंबाखूच्या व्यसनापासून वाचवावे, असे आवाहन DoSEL चे सचिव संजय कुमार यांनी केले. 

DoSEL चे अतिरिक्त सचिव आनंदराव व्ही. पाटील यांनी तंबाखूपासून मुलांचे संरक्षण केवळ आरोग्याची अत्यावश्यकता म्हणून नव्हे तर एक नैतिक कर्तव्य म्हणूनही महत्त्वावर भर दिला. तंबाखूमुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची आणि तंबाखूचा विद्यार्थ्यांवर घातक परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यावर त्यांनी भर दिला. त्यांनी तंबाखूच्या हानिकारक सेवनामुळे होणाऱ्या भीषण मृत्यू दरावर प्रकाश टाकला आणि हितधारकांना ToFEI साठी अंमलबजावणी नियमावली सक्रियपणे अंमलात आणण्यासाठी प्रोत्साहित केले.