ठाण्यातच.. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाला अल्प प्रतिसाद

धुळे, सिंधूदूर्ग, हिंगोली,सांगली,परभणी व बुलढाणा हे जिल्हे अभियान राबविण्यात आघाडीवर आहेत.

ठाण्यातच..  मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाला अल्प प्रतिसाद

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि त्यातून स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान (Chief Minister My School Beautiful School campaign)सुरू करण्यात आले आहे.मात्र,मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच या अभियानाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याची धक्कादायक माहिती 23 जानेवारीच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. ठाणे जिल्हयाबरोबरच पुणे, नाशिक, रत्नागिरी,सोलापूर आणि नागपूर (Pune, Nashik, Ratnagiri, Solapur and Nagpur) जिल्ह्यातूनही अभियानाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे प्राप्त माहिती वरून दिसून येत आहे.तर धुळे, सिंधूदूर्ग, हिंगोली,सांगली,परभणी व बुलढाणा (Dhule, Sindhudurg, Hingoli, Sangli, Parbhani , Buldhana) हे जिल्हे अभियान राबविण्यात आघाडीवर आहेत. तसेच विभाग निहाय विचार केला तर मुंबई विभाग अभियानात मागे असल्याचे दिसत आहे. 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे महत्वकांक्षी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान'सुरू करण्यात आले.विद्यार्थी, शाळा, शिक्षक यांच्यासाठी निश्चितच हे अभियान चांगले आहे.शासनातर्फे अनेक चांगल्या योजना राबविल्या जात आहेत.परंतु,शाळांकडून त्यात सहभाग नोंदवताना उदासीनता दिसून येत आहे.अभियान राबविण्यात प्रथम क्रमांकावर असणा-या धुळे जिलह्यातील 2 हजार 57 शाळांपैकी 1841 शाळांनी सहभाग नोंदवला आहे.मात्र,पुणे जिल्ह्यातील 7 हजार 653 शाळांपैकी केवळ 2 हजार 750 शाळांनी नोंदणी केली असून अजूनही 4 हजार 632 शाळांनी नोंदणी केलेली नाही.त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात 4 हजार 977 शाळांपैकी 835 शाळांनी नोंदणी केली असून 3 हजार 762 शाळांनी नोंदणी केलेली नाही. 

हेही वाचा : शिक्षक भरतीवर शासनाची सावध भूमिका ; ती पदे सोडून करणार भरती?

विभाग निहाय विचार केला तर औरंगाबाद विभाग पहिल्या क्रमांकावर असून कोल्हापूर दुसऱ्या, लातूर तिसऱ्या,नाशिक चौथ्या, अमरावती पाचव्या, पुणे सहाव्या, नागपूर सातव्या तर मुंबई शेवटी म्हणजे आठव्या क्रमांकावर आहे. 
---------------------