सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ.सुनील भिरुड 

डॉ भिरुड हे वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत संगणक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागात प्राध्यापक पदावर काम करीत आहेत.

सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ.सुनील भिरुड 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (Government Engineering College Pune University of Technology) कुलगुरु पदी डॉ.सुनील गंगाधर भिरुड(Dr. Sunil Bhirud as Chancellor) यांची नियुक्ती झाली आहे.डॉ भिरुड हे वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत संगणक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागात प्राध्यापक पदावर काम करीत आहेत.

 कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे चे रूपांतर विद्यापीठात झाले असून विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोण नियुक्त होणार याबाबत शिक्षण क्षेत्रात चांगलीच उत्सुकता होती.अखेर राज्यपाल रमेश बैस यांनी डॉ.सुनील भिरुड यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ विजय फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली.डॉ विजय फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे वरिष्ठ प्राध्यापक असून ते भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख होते.तसेच नागपूर येथील सी पी अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद अरविंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राज्यपालांनी नियुक्ती केली आहे.

सर्व कुलगुरुंची नियुक्ती ते पदभार स्वीकारल्याचे दिनांकापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा संबंधित कुलगुरु वयाची ६५ वर्षे पूर्ण करीपर्यंत - यापैकी जे अगोदर असेल त्या दिनांकापर्यंत -करण्यात आली आहे.