एनईपीमध्ये  व्यवसाय शिक्षण,क्रॉस कटिंग याचा संदर्भ महत्त्वाचा

अनुभवी तज्ञ मार्गदर्शकाच्या प्रत्यक्ष व्याख्यानातून राज्यस्तरीय प्रशिक्षक तयार होत आहेत.

एनईपीमध्ये  व्यवसाय शिक्षण,क्रॉस कटिंग याचा संदर्भ महत्त्वाचा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पाठ्यपुस्तक शिकवताना अभ्यासक्रम समजून घेणे गरजेचे आहे, त्याचबरोबर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अपेक्षित व्यवसाय शिक्षण, क्रॉस कटिंग याचा संदर्भ महत्त्वाचा आहे, असे मत असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक डॉ. शोभा खंदारे यांनी व्यक्त केले.( State Educational Research and Training Council Joint Director Dr. Shobha Khandare)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली  इयत्ता नववी ते बारावी साठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू झाले.या  कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.शोभा खंदारे बोलत होत्या.सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा येथे चार दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी संपूर्ण राज्यभरातून सुमारे ३६० पेक्षा  प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

या प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20, एनसीएफ क्रॉस कटिंग, कुमारवयीन मुलांचे भाव विश्व उलगडताना ,क्षमता आधारित मूल्यांकन व शाळा स्तर मूल्यांकन माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग ,कृती संशोधन व नवोपक्रम अनुभवजन्य   व खेळधारित अध्यापनशास्त्र, 21 व्या शतकातील कौशल्य व भविष्यवेधी शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन, NAS अहवाल विश्लेषण, प्रभावी शैक्षणिक नेतृत्व  अशा 12 विषयांचा समावेश आहे .यासाठी आवश्यक वाचन साहित्य पुरवणारी शिक्षक मार्गदर्शिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनुभवी तज्ञ मार्गदर्शकाच्या प्रत्यक्ष व्याख्यानातून राज्यस्तरीय प्रशिक्षक तयार होत आहेत, अशी माहिती डॉ.शोभा खंदारे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, यावेळी उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनीही शिक्षण प्रक्रियेत झालेल्या कृती संशोधन,नवोपक्रम, नव्या अध्यापन पद्धती, एकात्मिक विषय योजना या सर्व घटकांची शिक्षक म्हणून धोरणात्मक दिशा माहीत असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेचे अरुण जाधव,अधिव्याख्याता ,सीपीडी विभाग यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ. दत्तात्रय थिटे, संशोधन विभाग, स्वागत डॉ. अरूण सांगोलकर तर आभार डॉ .अजयकुमार फुंदे यांनी मानले. 
राज्यस्तरीय प्रशिक्षण घेऊन पुढे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नियोजनातून हे सर्व घटक शाळेतील प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे अशी भावना सर्व प्रशिक्षकांनी व्यक्त केली.सदर नियोजन व संनियंत्रण डॉ. दत्ता थिटे , संशोधन विभाग व श्री. अरूण जाधव,सीपीडी विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले.