प्रतिभाताई पाटील,राम नाईक,ॲड. उज्वल निकम यांच्यासह नऊ जणांना जीवनसाधना गौरव पुरस्कार 

विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर उपस्थित राहणार आहेत.

प्रतिभाताई पाटील,राम नाईक,ॲड. उज्वल निकम यांच्यासह नऊ जणांना जीवनसाधना गौरव पुरस्कार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून येत्या १० फेब्रुवारीला विद्यापीठाचा ७५ वा वर्धापन दिन आहे.या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या 'जीवनसाधना गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर उपस्थित राहणार आहेत.माजी राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील ,माजी राज्यपाल  राम नाईक,ॲड. उज्वल निकम यांच्यासह नऊ जणांना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. (Pune University, Life Achievement Award , Pratibhatai Patil,  Ram Naik , Adv Ujwal Nikam) 

विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठातर्फे विविध पुरस्कार देण्यात येतात.या वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना 'जीवनसाधना गौरव पुरस्कार'दिला जाणार आहे.विद्यापीठातर्फे राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी भारताच्या माजी राष्ट्रपती तसेच विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी प्रतिभाताई देवीसिंह पाटील तसेच राजकीय व सामाजिक  क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी  उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक,कायदा क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी ॲड.. उज्वल निकम, उद्योजकता व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी मिलिंद कांबळे, शैक्षणिक व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी  कृ‍षिरत्न अनिल घमाजी मेहेर, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी सतीशराव शिवाजीराव काकडे देशमुख, शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी  कृष्णकुमार गोयल, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी प्राचार्य ठकाजी नारायण कानवडे आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी  हेमंत हरिभाऊ धात्रक यांची 'जीवनसाधना गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा : एम.फिल.धारक, प्राचार्यांचे वेतन, प्राध्यापक शैक्षणिक अहर्तेसह प्रलंबित प्रश्न लागले मार्गी
 
वर्धापन दिन सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील,  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी,  प्र-कुलगुरू प्रा.पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. विजय खरे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य उपस्थित राहणार आहेत.१० तारखेला हा कार्यक्रम दोन भागात होणार असून २ ते ४ दरम्यान विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना परिसंस्थांनां (महाविद्यालय) आणि  ‘युवा गौरव पुरस्कार्थींना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. तर संध्याकाळी ४. ४५ वाजता आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते  मान्यवरांना 'जीवनसाधना गौरव पुरस्काराने'सन्मानित करण्यात येणार आहे.
----------------------------

वर्धापन दिनी देण्यात येणारे युवा गौरव पुरस्कार (२०२३ – २४)

१. कला -माने मकरंद मधुकर -  चित्रपट दिग्दर्शक व निर्माता
२. क्रीडा - पुराणिक अभिमन्यू समीर - बुध्दिबळ आणि सोमण प्रणिता प्रफुल्ल - रोड सायकलिंग
3. साहित्य -जाधवर ज्ञानेश्वर प्रकाश - युवा साहित्य अकादमी पुरस्कार नामांकन व इतर

 
उत्कृष्ट महाविद्यालय / परिसंस्था पुरस्कार
 १. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग)- ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे, इन्स्टिटयुट ऑफ इन्फरमेशन टेक्नॉलॉजी, पुणे ४११००१.
२. व्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग)- संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीचे, कॉलेज ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, ता. कोपरगाव, जि.अहमदनगर
३. अव्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) -  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, प्रा.रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याल, आकुर्डी, पिंपरी चिंचवड, पुणे
४. अव्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) - डांग सेवा मंडळाचे, दादासाहेब बिडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, पेठ, जि. नाशिक


 उत्कृष्ट प्राचार्य / संचालक पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) - डॉ. पाटील मनोहर जनार्दन, मराठवाडा मित्र मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, पिंपरी रोड, थेरगांव, पुणे
२. अव्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) डॉ. रसाळ पुंडलिक विठ्ठल मराठा विद्या प्रसारक समाजाचे जीएमडी कला बीडब्ल्यू वाणि आणि विज्ञान महाविद्यालय, ता सिन्नर, जि. नाशिक


उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग)- डॉ. मुंजे रविंद्र कचरू कर्मवीर काकासाहेब वाघ इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग, एज्युकेशन अॅन्ड रिसर्च, पंचवटी, नाशिक
२. व्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) - डॉ. सय्यद एतेशामुद्दीन शमशुद्दीन संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, सहजानंदनगर, पो. शिंगणापूर, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर
३. अव्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) -  डॉ. गणपुले शिल्पागौरी प्रसाद , प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, पुणे
४. अव्यावसायिक अभ्यासक्रम विभाग (ग्रामीण विभाग)- डॉ. मगदुम सुजाता मार्तंड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दिंडोरी, ता. दिंडोरी जि. नाशिक


उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार
१. व्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग)- डॉ. आर अरोकिया प्रिया चार्ल्स डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च, रावेत, आकुर्डी, पुणे 
२. व्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग)- डॉ. खियानी सिमरन राजीव जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, पुणे-नगर रोड, वापोली, पुणे
३. अव्यावसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग)- डॉ. भाकरे शरयु सुरेश, सिम्बायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सेनापती बापट रोड, पुणे
४.अव्यावसायिक अभ्यासक्रम (ग्रामीण विभाग) - डॉ. मुळे योगिनी रामकृष्ण, तुळजाराम चतुरचंद, बारामती, जि. पुणे


 उत्कृष्ट नाविन्यपूर्ण विशेष उपक्रम / संशोधन पुरस्कार
१. डॉ. लोमटे बिना माधवराव - | रसिकलाल एम. धारीवाल सिंहगड टेक्निकल इन्स्टिटयूट्टस कॅम्पस, वारजे, मुंबई - बंगलोर बायपास, पुणे


उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार (शहरी विभाग)
१. शहरी विभाग -  डॉ. नाईकवाडी प्रियांका विठ्ठल , श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, पुणे


उत्कृष्ट संचालक, शारीरिक शिक्षण व क्रिडा पुरस्कार 
१. शहरी विभाग  - डॉ. शेंडेंकर दीपक तानाजी, मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे
२. ग्रामीण विभाग - डॉ. जाधव नारायण माधव,  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगांव, ता. निफाड, जि. नाशिक
 
 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अध्यापकांचा सत्कार
 १. डॉ. मारू अविश व्दारकादास, लोकनेते डॉ. जे. डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसी, नूर, ता. कळवण, जि. नाशिक


उत्कृष्ट विद्यापीठ विभाग पुरस्कार (विज्ञान / तंत्रज्ञान विद्याशाखा )
 १. वनस्पतिशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. संयुक्तपणे
विभागुन जैवतंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.