आयटीआयची प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जूनला तर अंतिम यादी 3 जुलैला होणार जाहीर
आयटीआय प्रवेशासाठी चार फेऱ्या राबविण्यात येणार असून राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत (Craftsman Training Scheme) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीसह 27 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. याशिवाय आयटीआय अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी (Preliminary merit list) 30 जून रोजी, तर अंतिम गुणवत्ता (Final list) यादी 3 जुलै रोजी जाहीर होणार आहे.
आयटीआय प्रवेशासाठी चार फेऱ्या राबविण्यात येणार असून राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी चार फेऱ्या राबविण्यात येणार असून त्यानंतर संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आणि खासगी आयटीआयमधील संस्था स्तरावरील प्रवेश होणार आहेत.
या प्रक्रियेतील प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जून रोजी जाहीर होणार आहे. या गुणवत्तायादीबाबत हरकती नोंदविणे आणि प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी 30 जून ते १ जुलैपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. अंतिम गुणवत्ता यादी ३ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. पहिल्या फेरीतील निवड यादी ९ जुलैला प्रसिद्ध होणार असून यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 10 ते 15 जुलैपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
पहिली प्रवेश फेरी
पहिल्या फेरीसाठी निवड यादी जाहीर करणे : 9 जुलै
यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष प्रवेश घेणे : 10 ते 15 जुलै
दुसरी प्रवेश फेरी : 10 ते 28 जुलै
तिसरी प्रवेश फेरी : 23 जुलै ते 8 ऑगस्ट
चौथी प्रवेश फेरी : 4 ते 19 ऑगस्ट
संस्थास्तरीय समुपदेशन फेरी : 21 ते 28 ऑगस्ट
खासगी आयटीआयमधील संस्था स्तरावरील प्रवेश : 10 जुलैपासून
‘आयटीआय’ संपूर्ण प्रवेशाचे वेळापत्रक