NTA कडून NCHM JEE साठी हॉल तिकिट प्रसिध्द 

NTA तर्फे येत्या 11 मे  रोजी NCHM JEE परीक्षा घेतली जाईल.

NTA कडून NCHM JEE साठी हॉल तिकिट प्रसिध्द 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (NCHM JEE) साठी हॉल तिकिट (Hall ticket)प्रसिध्द केले आहे .परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट- exams.nta.ac.in/NCHM वरून त्यांचे हॉल तिकिट डाउनलोड करू शकतात.

उमेदवारांनी हॉल तिकिट डाऊनलोड करण्यासाठी वेबसाइटवर लॉग इन करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांसारख्या क्रिडेन्शियल भरावे लागतील. 
NTA तर्फे येत्या 11 मे  रोजी NCHM JEE परीक्षा घेतली जाईल . नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंगशी संलग्न असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) मध्ये B.Sc हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते.

अधिकृत सूचनेनुसार, "प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात कोणतीही अडचण आल्यास किंवा प्रवेशपत्रातील तपशीलांमध्ये विसंगती असल्यास, उमेदवार NTA हेल्प डेस्कशी 011-40759000 वर संपर्क साधू शकतात किंवा nchm@nta वर ई-मेल पाठवू शकतात. 

असे करावे प्रवेश पत्र डाउनलोड 

* सर्व प्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट- Exams.nta.ac.in/NCHM ला भेट द्यावी.
* त्यानंतर मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या “NCHM प्रवेशपत्रासाठी येथे क्लिक करा” या लिंकवर क्लिक करा.
* आता तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन टाका.
* सबमिट बटणावर क्लिक करा.
* NCHMCT JEE 2024 हॉल तिकिट ओपन केले जाईल.
* आता पुढील आवश्यकतेसाठी प्रिंटआउट घ्या