सध्या नववी, अकरावीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; दोनदा देता येणार बोर्डाची परीक्षा

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून वर्षातून दोन वेळा बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती प्रधान एका वृत्त संस्थेशी बोलताना दिली.

सध्या नववी, अकरावीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; दोनदा देता येणार बोर्डाची परीक्षा
Dharmendra Pradhan

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP 2020) शैक्षणिक क्षेत्रात अनेक महत्त्वाचे आणि मोठे बदल होत आहेत. सर्वात मोठा बदल दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत (Board Exams) होणार आहे.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत  बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार आहेत. हा बदल कधीपासून अंमलात आणला जाईल, याविषयी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

 

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून वर्षातून दोन वेळा बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती प्रधान एका वृत्त संस्थेशी बोलताना दिली. म्हणजेच सध्या नववी व अकरावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावी आणि बारावीत गेल्यानंतर बोर्डाच्या परीक्षा दोनदा देता येणार आहेत. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात दोनदा परीक्षा घेतल्या जाणार आहे. बोर्डाच्या परीक्षा शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच २०२५ मध्ये होणार आहेत.

SSC Board Exam : दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरूवात

 

सध्या बोर्डाच्या परीक्षा दरवर्षी दहावी आणि बारावीच्या शेवटी घेतल्या जातात. त्यात बदल केल्यानंतर आता प्रत्येक परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची तयारी सुरू आहे. मात्र, विद्यार्थ्यांसाठी हे ऐच्छिक असेल. तयारीच्या आधारावर, विद्यार्थी एक किंवा दोनदा परीक्षा देऊ शकतो. विद्यार्थ्यांवर कोणतीही सक्ती केली जाणार नाही. गुणपत्रिकेत केवळ विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम गुण समाविष्ट केले जातील. त्यामुळे मुलांवरील परीक्षेचा ताण कमी होईल, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.

 

प्रधान म्हणाले, "सध्या नवीन शालेय अभ्यासक्रम त्याच्या शिफारशींनुसार तयार केला जात आहे. आता आम्ही अंमलबजावणीच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. शैक्षणिक सत्र २०१४-२५ मध्ये  इयत्ता तिसरी ते सहावी, इयत्ता नववी आणि  अकरावीची पाठ्यपुस्तके तयार होतील. तर  उर्वरित वर्गांची पाठ्यपुस्तके २०२५-२६ या वर्षात तयार होतील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k