प्रत्येकाचा एव्हरेस्ट वेगळा असतो :   एव्हरेस्टवीर अपर्णा प्रभुदेसाई 

नवीन सवयी लावणे, जुन्या सवयी सोडणे, शारिरक किंवा मानसिक अडचणींवर मात मिळवणे, हे ही आपल्या आयुष्यातले एव्हरेस्टच आहेत,या सर्वांवर विजय मिळवण म्हणजेच आपल्या आयुष्यातील एव्हरेस्ट पार करण्यासाखच आहे.

प्रत्येकाचा एव्हरेस्ट वेगळा असतो :   एव्हरेस्टवीर अपर्णा प्रभुदेसाई 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

'' मी जरी एव्हरेस्ट पर्वत (mount everest) सर केला असला तरीही प्रत्येकाच्या आयुष्यात एक एव्हरेस्ट असतो आणि तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो ", असे प्रतिपादन एव्हरेस्टवीर अपर्णा प्रभुदेसाई (Aparna Prabhudesai) यांनी केले. तसेच त्यांनी व्हीलचेअर ते एव्हरेस्टपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. 

हेही वाचा : स्पर्धा परीक्षा सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; MHT-CET १६ एप्रिलपासून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमात प्रभुदेसाई बोलत होत्या. नवरात्र तसेच विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात येत आहे. प्रभुदेसाई यांचा सत्कार केल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी कुलसचिव डॉ, प्रफुल्ल पवार, वित्तलेखा अधिकारी श्रीमती चारुशीला गायके,  व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या श्रीमती बागेश्री मंठाळकर, विधी विभागाच्या प्राध्यपिका डॉ. ज्योती भाकरे, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. करिश्मा परदेशी, सिनेट सदस्या ॲड. ईशानी जोशी आणि डॉ अपर्णा लळींगकर उपस्थित होत्या. 

नवीन सवयी लावणे, जुन्या सवयी सोडणे, शारिरक किंवा मानसिक अडचणींवर मात मिळवणे, हे ही आपल्या आयुष्यातले एव्हरेस्टच आहेत,या सर्वांवर विजय मिळवण म्हणजेच आपल्या आयुष्यातील एव्हरेस्ट पार करण्यासारखं असल्याचे अपर्णा प्रभुदेसाई म्हणाल्या.

या कार्यक्रमाची प्रस्तावना उपकुलसचिव डॉ. वैशाली साकोरे यांनी केली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यावाणीच्या निर्मात्या श्रीयोगी मांगले यांनी केले. पाच दिवस सुरु असलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.