सांगा पुस्तकातील वह्यांची पाने कशी वाटतात? बालभारतीचे सर्वेक्षण

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने पाठ्यपुस्तकात व यांची पाने देण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला.

सांगा पुस्तकातील वह्यांची पाने कशी वाटतात? बालभारतीचे सर्वेक्षण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 


महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ अर्थात बालभारती (Balbharti) यांच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकांमध्ये (Books) वह्यांच्या पानांचा समावेश करून पुस्तके तयार  करण्यात आली. उपक्रमाची उपयोगिता व यशस्विता सर्वेक्षणाच्या माध्यमातून तपासणी जाणार आहे. (Balbharti Survey)


विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने पाठ्यपुस्तकात व यांची पाने देण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. त्यानंतर इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी हिंदी इंग्रजी उर्दू या माध्यमासाठी एकात्मिक पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आता शिक्षक पालक विद्यार्थी यांच्याकडून विशिष्ट प्रश्नावलीच्या माध्यमातून याबाबतचा प्रतिसाद नोंदवून घेतला जाणार आहे बालभारती तर्फे त्यासाठी एक लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत ही लिंक सुरू राहणार आहे.

सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; MHT-CET १६ एप्रिलपासून


 पाठ्यपुस्तकात लावलेल्या वह्यांच्या पानाचा उपयोग आणि फायदा यावर १२ प्रश्न विचारले आहेत.ebalbharati.in या संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर शिक्षक, पालक,  विद्यार्थी या पैकी एक पर्याय निवडायचा आहे. मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक टाकाल्यानंतर बारा प्रश्न स्क्रीनवर दिसतील आहे.त्यासर्वांची उत्तरे द्यायाची आहेत. 

बालभारतीने पालकांना विचारलेले प्रश्न पुढीलप्रमाणे: 

१) सर्व विषयांचे एकत्रित पुस्तक असणे योग्य आहे की अयोग्य, 


२) तुमच्या पाल्याच्या दप्तरात कोणकोणत्या गोष्टी असतात,

३)एकात्मिक पाठ्यपुस्तकामुळे दप्तराचे ओझे तेवढेच राहिले, अंशतः कमी झाले खूप कमी झाले,


४) वयांची कोरी पृष्ठे घातलेली एकात्मिक पुस्तके तुमच्या पाल्याला आवडतात का?

 
५) एकात्मिक पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग आहेत तुमचा पाल्य एकावेळी शाळेत किती भाग घेऊन जातो.

६) तुमच्या पाल्याने माझी नोंद या कोऱ्या पृष्ठावर घेतलेल्या नोंदी तुम्ही पाहता का?

७) माझी नोंद मधील नोंदीचा उपयोग पाल्य कशासाठी करतो.

८) तुम्ही तुमच्या पाल्याची पाठ्यपुस्तके केव्हा पाहता

९) तुमच्या पाल्याला माझी नोंद या पृष्ठावर नोंदी घेताना काही अडचणी येतात.

१०) पाल्याने एकात्मिक पाठ्यपुस्तकातील व यांच्या पृष्ठाबाबत काही तक्रार केली आहे का?

११) तुम्ही पाल्याला शाळेसाठी किती वह्या दिल्या आहेत.

१२) ही एकात्मिक पाठ्यपुस्तके तुम्हाला आवडली का?

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k