शासकीय आश्रमशाळांमध्ये आता व्यावसायिक शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी होणार 

आदिवासी विकास विभागाने लेंड अ हँड इंडिया या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूर्व व्यवसाय शिक्षण देण्याचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आले आहे. 

शासकीय आश्रमशाळांमध्ये आता व्यावसायिक शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी होणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आदिवासी विकास विभागाच्या (Department of Tribal Development) शासकीय आश्रम शाळांमध्ये (Government Ashram School) आता व्यावसायिक शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी (Effective implementation of vocational education) केली जाणार आहे. यासाठी आदिवासी विकास विभागाने लेंड अ हँड इंडिया या संस्थेसोबत सामंजस्य करार (Memorandum of Understanding) केला आहे. या कराराच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूर्व व्यवसाय शिक्षण देण्याचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आले आहे. 

आदिवासी विकास विभागाच्या राज्यात एकूण ४८७ शासकीय आश्रमशाळा असून त्यामध्ये दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर सन २०१४-१५ शैक्षणिक वर्षांपासून व्यवसाय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, आता यावर प्रभावी अंमलबजावणी करण्याची निर्णय घेण्यात आला आहे. 

लैंड अ हँड इंडियाच्या सामंजस्य करारामुळे आता इयत्ता ६ वी ते ८ वीच्या २६ हजार ६७२ विद्यार्थ्यांना पूर्व व्यवसाय शिक्षण देण्यात येणार आहे. या सामंजस्य करराप्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांच्यासह अन्य संबंधित क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

इयत्ता सहावीपासूनच पूर्व व्यावसायिक शिक्षण 

व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी पहिल्या टप्प्यात २१३ शासकिय आश्रम शाळांची निवड करण्यात आली आहे. टप्प्याटप्याने उर्वरित आश्रमशाळा यात सामावून घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता सहावीपासूनच पूर्व व्यावसायिक शिक्षण दिले जाईल, असे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी सांगितले. सध्या राज्यातील १७९ आश्रम शाळांमध्ये विद्यार्थी इयत्ता ९ ते १२ वी पर्यंत व्यवसाय शिक्षण घेत आहेत.