आमदार बंब यांच्या भूमिकेमुळे शैक्षणिक वातावरण पुन्हा तापले ; स्वपक्षियांनी दिला घरचा आहेर

शिक्षकांना महागाई भत्त्यात चार टक्के वाढ देऊ नये, अशी मागणी बंब यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडे केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आमदार बंब यांच्या भूमिकेमुळे शैक्षणिक वातावरण पुन्हा तापले ; स्वपक्षियांनी दिला घरचा आहेर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षकांविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब  (Bharatiya Janata Party MLA Prashant Bomb) यांनी आता शिक्षकांना महागाई भत्त्यात ( Dearness allowance to teachers) चार टक्के वाढ देऊ नये,अशी मागणी केली आहे.त्यामुळे शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात असून निषेध नोंदवला (Protest registered ) जात आहे. तसेच इतर आमदारांनी त्यांच्या भूमिकेशी उघडपणे असहमतता दर्शविली आहे.तर त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी तिखट मजकूर लिहिलेले पत्र काढून घरचा आहेर दिला आहे.

भारतीय जनता पक्षाचे गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत यांनी अनेक वेळा शिक्षकांच्या कामकाजावर टिका केल्याचे दिसून आले आहे. विधिमंडळातही शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या देखभाल बाबत त्यांनी मात व्यक्त केले होते.त्यामुळे बंब आणि शिक्षक यांच्यात सातत्याने होणारी शाब्दिक चकमक कोणापासूनही लपून राहीली नाही.आता शिक्षकांना महागाई भत्त्यात चार टक्के वाढ देऊ नये, अशी मागणी बंब यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडे केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिक्षक संघटनांनी सुद्धा बंब यांच्या विरोधात भूमिका घेत निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, " प्रशांत बंब यांच्या विधानातून सातत्याने शिक्षकांविषयीचा द्वेष दिसून येतो. त्यामुळेच नागपूर व अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला प्रभाव स्वीकारावा लागला. आपणाला विद्यार्थी व शासनाच्या पैशाप्रती आस्था असेल तर स्वतःच्या मतदारसंघात २० स्वयम अर्थ साहित्य शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊन दाखवा. कोणी चुकत असेल तर निश्चितच आवाज उठवा. पण राज्य भरातील शिक्षकांचा अपमान करून पवित्र शिक्षण क्षेत्राला बदनाम करून पक्षाला अडचणी आणण्याचा विडा उचलू नका ", अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे अमरावती विभागाचे प्रदेश सहसंयोजक, पदवीधर प्रकोष्ठ व महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष मनिष गावंडे यांनी घरचा आहेर दिला आहे.

शिक्षक करत असलेले काम व त्यांची विद्यार्थ्यांप्रती, समाजाप्रती असलेली तळमळीनची बंब यांना जाणीव नाही. शिक्षकांना सतत ऑनलाईन कामकाज देवून २४ तास शिक्षक शासानासाठी व सरकारसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यामानाने आमदार प्रशांत बंब हे आपल्या मतदार संघात कधीच ऑफलाईन व ऑनलाईन उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांची आमदारकीच रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषद करणार आहे. तसेच सोमवार दिनांक ४ ते ६ डिसेंबर तीन दिवस तसेच जोपर्यंत बंब शिक्षकांची माफी मागत नाही.तोपर्यंत आपल्या स्टेटसला व प्रोफाइलला आमदार बंब यांचा जाहीर निषेधार्थ बॅनर ठेवणार असल्याचे शिक्षक परिषदेचे प्रांतअध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी सांगितले.

-------------