शालार्थसाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून मिळेनात कागदपत्रे; शिक्षकांच्या वेतनावर टांगती तलवार

पुणे विभागाच्या सहाय्यक शिक्षण संचालक डॉ. ज्योती सोळंकी यांनी २० टक्के अनुदान प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र पाठवून कार्यालयाकडे कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे.

शालार्थसाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून मिळेनात कागदपत्रे; शिक्षकांच्या वेतनावर टांगती तलवार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पुणे, अहमदनगर व सोलापूरमधील काही कनिष्ठ महाविद्यालयांना (Junior Colleges) २० टक्के अनुदान प्राप्त झाले आहे. येथील नियुक्त शिक्षकांना (Teachers) ऑनलाईन शालार्ड (Shalarth) वेतन प्रणालीमार्फत अनुदान देण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून वारंवार आवश्यक कागदपत्रांची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत कागदपत्रे मिळत नसल्याने शिक्षकांच्या वेतनावर टांगती तलवार आहे. (School Education Department)

 

पुणे विभागाच्या सहाय्यक शिक्षण संचालक डॉ. ज्योती सोळंकी यांनी २० टक्के अनुदान प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र पाठवून कार्यालयाकडे कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे. नियुक्त शिक्षकांना ऑनलाईन शालार्थ वेतन प्रणालीमार्फत २० टक्के अनुदान देण्यासाठी संबंधित विद्यालयांच्या प्राचार्यांनी संबंधित शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे नाव ऑनलाईन शालार्थ वेतन प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत.

अभ्यासक्रम आराखडा : सुचनांसाठीचा कालावधी तोकडा, ३० दिवसांची मुदत देण्याची मागणी

 

विभागीय कार्यालयामार्फत प्राचार्य तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी तोंडी तसेच लेखी सूचना वारंवार देण्यात आल्या होत्या. परंतु अद्यापपर्यंत ही कागदपत्रे कार्यालयाकडे प्राप्त झालेले नाहीत, असे पत्रात म्हटले आहे.

 

 

त्यामध्ये २० टक्के अनुदान आदेश, जावक रजिस्टर सत्यप्रत, मुल्यांकन किंवा अनुदान करतेवेळीची पूर्ण रोष्टर त्यात अनुदान पात्र कार्यरत शिक्षकांची नावे व संवर्ग अधोरेखित केलेला असावा, सध्याचे किंवा अद्ययावत रोष्टर त्यात अनुदान पात्र कार्यरत शिक्षकांची नावे व संवर्ग अधोरेखित केलेला असावा, २०१४ पासूनच्या सर्व संचमान्यता, २०२२-२३ ची संचमान्यता, मूळ जाहिरात ही कागदपत्रे संस्था संचिका सादर करणेवेळी सादर करावी लागणार आहेत.

 

 

वैयक्तिक संचिका सादर करताना वरील सर्व कागदपत्रांशिवाय यापूर्वी निर्देशित केलेली कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. संबंधित कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास आणि संबंधित शिक्षकांचे नाव ऑनलाईन शालार्थ वेतन प्रणालीमध्ये समाविष्ट न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील, असे डॉ. सोळंकी यांनी स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k