5th and 8th scholarship : शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज येत्या १५ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहेत.तर विलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर या कालावधीत भरता येतील .

5th and 8th scholarship : शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा (5th and 8th scholarship) येत्या १८ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली असून या परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा अर्ज (Exam form )भरण्याकरीता येत्या १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज येत्या १५ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहेत.तर विलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह २४ ते २७ डिसेंबर आणि अतिविशेष विलंब शुल्कासह २८ ते ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन परीक्षा अर्ज  भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत आवेदनपत्रे स्वीकारले जाणार नाही. याची नोंद घेऊन शाळांनी ऑनलाईन अर्ज येत्या १५ डिसेंबरअखेरपर्यंत भरण्याची कार्यवाही करावी, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी कळविले आहे.

हेही वाचा : ICSE board exam timetable : ICSE बोर्डाच्या १० वी, १२ वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
 
परीक्षा परिषदेने या वर्षी परीक्षा अर्ज भरून घेण्यास लवकर सुरूवात केली आहे.त्यामुळे यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.डिसेंबर महिना अखेरपर्यंत प्राप्त होणाऱ्या परीक्षा अर्जामधून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असणार आहे.