दिल्ली हादरली! कपडे फाडले, नको ते केलं, काॅलेज विद्यार्थिनीसोबत अमानुष अत्याचार..
दिल्लीतील छत्तरपूर परिसरात दक्षिण आशियाई विद्यापीठ आहे. या विद्यापीठातील एक विद्यार्थिनी सोमवारपासून बेपत्ता होती. मंगळवारी ती जखमी अवस्थेत आढळली. तिच्या अंगावरचे कपडे फाटले होते आणि अंगावर जखमाही होत्या. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी घडली. दोन दिवसांपर्यंत ना पोलिसांना बोलावण्यात आले ना विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi Crime News) महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा एखादा सिद्ध झालं आहे. दिल्लीतील साऊथ एशियन विद्यापीठातील (South Asian University) धक्कादायक घटना बाहेर आली आहे. येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर ४ जणांनी मिळून सामुहिक बलात्कार (Gang rape of a student) करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनीने केला आहे. तिच्या अंगावरचे कपडे फाडण्यात आले, तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करण्यात आला, तसेच ४ जणांनी मिळून तिच्यावर अमानुष अत्याचार केला. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआरआर नोंदवला (Delhi Police registers FRR) आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र, या घडणेमुळे दिल्लीत महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वस्ती शाळेतील शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या शासन स्तरावर हालचाली..
दिल्लीतील छत्तरपूर परिसरात दक्षिण आशियाई विद्यापीठ आहे. या विद्यापीठातील एक विद्यार्थिनी सोमवारपासून बेपत्ता होती. मंगळवारी ती जखमी अवस्थेत आढळली. तिच्या अंगावरचे कपडे फाटले होते आणि अंगावर जखमाही होत्या. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी घडली. दोन दिवसांपर्यंत ना पोलिसांना बोलावण्यात आले ना विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ओळखीच्या व्यक्तीकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मंगळवारी वैद्यकीय तपासणी केली विद्यार्थिनीचा जबाब नोंदवला. पीडितेने एका गार्ड, दोन विद्यार्थी आणि एका अज्ञात पुरूषावर आरोप केले आहेत.
एफआयआरनुसार, 12 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता, पीडिता मेस हॉलकडे जाणाऱ्या रस्त्याने एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीजवळ बसली होती. ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. तिथे एक सुरक्षारक्षक तैनात होता. त्याने कोणालातरी हाक मारली, पण पीडितेला त्यांचे संभाषण ऐकू आले नाही. सुरुवातीला ते आपापसात गप्पा मारत होते. थोड्या वेळाने दोन मुले तिच्याकडे धावत आली त्यापैकी एकाने तिचे खांदे धरले आणि तिचे जॅकेट काढण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्याने तिच्या डोळ्यात बोट घालून तिला वरच्या मजल्यावर ओढण्यास सुरुवात केली.
आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी जबरदस्ती तिच्या तोंडात गर्भनिरोधक गोळी कोंबली आणि मग त्यांनी तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. पिडीतेसोबत अत्याचार होत असताना, एक मेस कर्मचारी गाडी घेऊन आला. त्यांना येताना पाहून ते चारही आरोपी पळून गेले. या संपूर्ण घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वसतिगृह प्रमुखाचे वर्तन. आहे त्याला आदल्या रात्रीच संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली होती. मात्र, त्याने घटनास्थळी धावून पीडितेला मदत करण्याऐवजी त्याने तिला सकाळी येण्यास सांगितले. शिवाय, त्यांनी पोलिसांना बोलवा किंवा तिला रुग्णालयात घेऊन जाण्याच्या तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले, त्याऐवजी तिला कपडे बदलून आंघोळ करण्यास सांगितले.
सोमवारी सकाळी, जेव्हा ती तिच्या कुटुंबियांना तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगण्यासाठी व्हिडिओ कॉल करत होती, तेव्हा तिला थांबवण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांना 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता विद्यार्थिनीकडून लैंगिक अत्याचाराची तक्रार मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आणि तिला समुपदेशनासाठी पाठवले. या घटनेमुळे पीडिता घाबरली होती. तिच्या जबाबाच्या आधारे, मंगळवारी भारतीय दंड संहितेच्या कलम 70, 62, 123, 140 (3), 115 (2), 126 (2) आणि 3 (5) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.