नववीतील विद्यार्थ्यांने काचेने चिरला आपल्याच वर्गातील मुलांचा गळा
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुण्यातील मांजरी परिसरातील एका खासगी शाळेत वार्षिक समारंभच्या आयोजनावरून वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला.या वादातून इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांने त्याच्याच वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा काचेने गळा चिरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एका 14 वर्षीय मुलाविरुद्ध कोणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. जखमी मुलाने 14 वर्षे मुलाविरोधात हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार मुलगा एका खाजगी शाळेत इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहे. 14 वर्षे मुलगा देखील त्याच वर्गात शिक्षण घेत असून दोघांमध्ये वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून वाद झाला.19 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता वर्गात संबंधित विद्यार्थ्याने खुनाची धमकी देत हे कृत्य केले.