संगणक टंकलेखन परीक्षा पद्धतीत बदल, इंग्रजी ५०/६० अभ्यासक्रमाला मान्यता 

आतापर्यंत मराठी, इंग्रजी ३०, ४० शब्द प्रती मिनिट संगणक टंकलेखनालाच शासनाची मान्यता होती. आता इंग्रजी ५०, ६० शब्द प्रती मिनिट अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीला मान्यता दिली आहे.

संगणक टंकलेखन परीक्षा पद्धतीत बदल, इंग्रजी ५०/६० अभ्यासक्रमाला मान्यता 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

लिपिक टंकलेखक पदावर नियुक्तीसाठी टंकलेखन प्रमाणपत्र मागितले जाते. केंद्र, राज्य सरकारच्या शासकीय, निमशासकीय कार्यालयासह खासगी संस्थांमध्ये ते आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे अलीकडे संगणक टंकलेखन प्रमाणपत्र प्रशिक्षण (Computer Typing Certificate Training) घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. आतापर्यंत मराठी, इंग्रजी ३०, ४० शब्द प्रती मिनिट संगणक टंकलेखनालाच शासनाची मान्यता होती. आता इंग्रजी ५०, ६० शब्द प्रती मिनिट अभ्यासक्रम (English 50, 60 words per minute course) व परीक्षा पद्धतीला मान्यता दिली आहे.

शासनमान्य टंकलेखन संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत परीक्षा घेऊन मराठी, इंग्रजी, हिंदी माध्यमाचे टंकलेखन प्रमाणपत्र दिले जाते. सहा महिन्यांच्या या अभ्यासक्रमासाठी वर्षातून दोनवेळा परीक्षा घेतली जाते. विद्यार्थी दरवर्षी लघुलेखनाची परीक्षा देतात. टंकलेखनाची ५०-६० शब्द प्रती मिनिट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी पात्र राहिले आहे. टंकलेखन यंत्र कालबाह्य टायपिंग इन्स्टिट्यूट मधील टंकलेखनाची टकटक जवळपास थांबली आहे. हे यंत्र कालबाह्य होत असून तयार करणाऱ्या कंपन्याही बंद पडल्या आहेत. त्यामुळेच टंकलेखन यंत्राची जागा संगणकाने घेतली आहे. बहुतांश विद्यार्थी संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा देतात. आता त्यांना इंग्रजी ५०-६० शब्द प्रती मिनिट प्रमाणपत्र परीक्षेची संधी आहे. 

आतापर्यंत टंकलेखन यंत्राद्वारे ५०-६० शब्द प्रती मिनिट ही परीक्षा दिलेले विद्यार्थी पात्र ठरले जात होते. आता टंकलेखनाच्या नव्याने मान्यता मिळालेल्या परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही लघुलेखनाच्या परीक्षेला प्रवेश दिला जाणार आहे. वर्षातून १५ ते २० हजार विद्यार्थी लघुलेखनाची परीक्षा देतात. २ संगणक टंकलेखन घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात १५० हून अधिक इंस्टिट्यूट आहेत. सुरुवातीला या इंस्टिट्यूटमध्ये टंकलेखनाच्या मशीन दिसत होत्या. कालांतराने ही संख्या कमी झाली आहे. आता जवळपास इंस्टिट्यूटमध्ये संगणकावर टंकलेखनाचा सराव करतानाचे चित्र दिसत आहे. संगणकाची सोय असलेल्या 3 महाविद्यालयांमध्ये संगणक टंकलेखन परीक्षा घेतली जाते.