'पूजा खेडकर' वादात बच्चू कडू यांची एंट्री 

सर्व फसवणूकीत सहभागी असणा-या अधिकारी, कर्मचारी यांची १५ दिवसाच्या आत चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा मी मुख्य सचिवांच्या दालनासमोर उपोषणास बसेल,असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 

'पूजा खेडकर' वादात बच्चू कडू यांची एंट्री 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 Pooja Khedkar controversy : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पुजा खेडकर (Pooja Khedkar)यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission)स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होण्याकरीता विविध प्रकारे शासनाची फसवणूक केली आहे.त्यामुळे पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate)देणारे संबंधीत डॉक्टर व यंत्रणा, तसेच नॉन क्रिमीलीयर प्रमाणपत्र (Non crimiliar certificate)देणारे अधिकारी व कर्मचारी, तसेच नावात बदल करणे, वय कमी दाखवणे अशा प्रकारच्या सर्व फसवणूकीत सहभागी असणा-यांची १५ दिवसाच्या आत चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी.अन्यथा मी मुख्य सचिवांच्या दालनासमोर उपोषणास बसेल,असा इशारा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी दिला आहे. 

पुजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला सादर केलेल्या प्रतीज्ञा पत्रात त्या मानसिक दृष्टया अक्षम असल्याचा व त्यांना दृष्टीदोष असल्याचे नमुद केलेले आहे. तसेच त्या ओबीसी प्रवर्गातील असून त्यांच्या पालकांचे उत्पन्न ८.०० लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र देखील सादर केलेले आहे.सदर दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र व ओबीसी नॉन क्रिमीलीअर प्रमाणपत्रामुळे त्यांना दिव्यांग प्रवर्गाचा व ओबीसी प्रवर्गाचा लाभ देऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची आयएएस संवर्गात निवड केलेली आहे. वास्तविक  पुजा दिलीप खेडकर हया ४० टक्के दिव्यांग असल्याचे सकृत दर्शनी दिसून येत नाहीत. त्यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र देखील बोगस असल्याचे समजते. त्यामुळे पुजा दिलीप खेडकर यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राची तातडीने तपासणी करण्यात यावी व अशाप्रकारे बनावट प्रमाणपत्र देणा-या संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी.

 पुजा खेडकर यांच्या पालकांचे वार्षीक उत्पन्न हे ८ लाखापेक्षा कितीतरी जास्त आहे, हे त्यांच्या वडीलांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात देखील नमूद केलेले आहे, असे असताना पुजा खेडकर यांना नॉन क्रिमीलीअर प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. ते कशाप्रकारे देण्यात आले, त्यास कोण कोण जबाबदार आहेत, याची चौकशी करण्यात यावी, व दोषी असलेल्या संबंधीतांवर तातडीने कारवाई करावी,असे निवेदन बच्चू कडू यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहे.त्यामुळे पुजा खेडकर वादात बच्चू कडू यांची एंट्री झाली आहे.