युजीसीचा विद्यार्थ्यांना इशारा : ... या ऑनलाइन अभ्यासक्रमांना चुकूनही प्रवेश घेऊ नका

अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, नर्सिंग, कृषी इत्यादी सुमारे 16 विषयांशी संबंधित ऑनलाइन अभ्यासक्रमांना चुकूनही प्रवेश न घेण्याचा सल्ला  UGC ने दिला आहे.

युजीसीचा विद्यार्थ्यांना इशारा  : ... या ऑनलाइन अभ्यासक्रमांना चुकूनही प्रवेश घेऊ नका

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी व पालकांना (students and parents)विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सतर्क राहण्याचा इशारा (alert signal) दिला आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, नर्सिंग, कृषी इत्यादी सुमारे 16 विषयांशी संबंधित ऑनलाइन अभ्यासक्रमांना (online courses)चुकूनही प्रवेश न घेण्याचा सल्ला  UGC ने दिला आहे.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फार्मसी, नर्सिंग, दंत, कृषी, कायदा, आर्किटेक्चर, हॉर्टिकल्चर, हॉटेल या उच्च शैक्षणिक संस्थांमधील 16 विषयांशी संबंधित ऑनलाइन अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ नये, असे आयोगाने विद्यार्थ्यांना सांगितले आहे. ऑनलाइन आणि खुल्या माध्यमातून या विषयांचा कोणताही अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, असे यूजीसीने म्हटले आहे.

आयोगाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आपल्या वेबसाइटवर ऑनलाइन अभ्यासक्रम चालविणाऱ्या मान्यता प्राप्त उच्च शैक्षणिक संस्थांची यादी देखील अपलोड केली आहे. ज्यामध्ये संस्थांच्या वैध ऑनलाइन अभ्यासक्रमांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होताना अनेक फसव्या संस्था विविध ऑनलाईन अभ्यासक्रमांचे अमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक करतात. या पार्शवभूमीवर UGC ने हा इशारा दिला आहे.