CUET UG परीक्षांच विषय झाले कमी; आता 'एवढ्याच' विषयांची होईल परीक्षा

जे विषय काढून टाकण्यात आले आहेत त्यांचे प्रवेश सामान्य पात्रता परीक्षेच्या गुणांवर आधारित असतील. गेल्या वर्षी ३३ भाषा आणि २९ डोमेन विषय होते. ही  CUET UG 2025 परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा 13 भारतीय भाषांमध्ये घेतली जाईल.

CUET UG परीक्षांच विषय झाले कमी; आता 'एवढ्याच' विषयांची होईल परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा (Common University Entrance Test) CUET UG 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी २२ मार्च २०२५ पर्यंत https://cuet.nta.nic.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही परीक्षा ८ मे ते १ जून २०२५ या कालावधीत देशातील २८५ शहरांमध्ये घेतली जाईल. दरम्यान परीक्षेशी निगडीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. CUET UG परीक्षेतील विषयांची संख्या 63 वरून 37 पर्यंत कमी करण्यात आली आहे. (The number of subjects in the CUET UG exam has been reduced from 63 to 37)

CUET UG परीक्षा देशातील २६० हून अधिक विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. या निर्णयानुसार   CUET UG परीक्षेतील विषयांची संख्या कमी करून  63 वरून 37 करण्यात आली आहे. ज्यामध्ये 13 भाषा, 23 डोमेन विशिष्ट विषय आणि 1 सामान्य अभियोग्यता चाचणी (GAT) समाविष्ट आहे. जे विषय काढून टाकण्यात आले आहेत त्यांचे प्रवेश सामान्य पात्रता परीक्षेच्या गुणांवर आधारित असतील. गेल्या वर्षी ३३ भाषा आणि २९ डोमेन विषय होते. ही  CUET UG 2025 परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा 13 भारतीय भाषांमध्ये घेतली जाईल.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने परीक्षेचा आढावा घेतला होता आणि अनेक महत्त्वाचे बदल सुचवले होते. या शिफारशींच्या आधारे, CUET UG मध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, 

* आता ३७ विषयांच्या परीक्षा असतील.
* उमेदवार कोणत्याही विषयाची परीक्षा देऊ शकतात.
* CUET UG 2025 मध्ये, उमेदवारांना जास्तीत जास्त पाच विषय निवडण्याची परवानगी आहे.  विद्यार्थी बारावीमध्ये न शिकलेले विषय निवडू शकतात. या बदलामुळे, विद्यार्थी आता बारावीमध्ये कोणत्याही पदवीपूर्व अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात. यासाठी त्यांना फक्त CUET प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.  * CUET UG 2025 ची परीक्षा पूर्णपणे CBT (संगणक आधारित चाचणी) मोडमध्ये असेल, तर गेल्या वर्षी ती हायब्रिड मोडमध्ये (CBT आणि पेन-पेपर मोड दोन्ही) घेण्यात आली होती. आता उमेदवारांना ६ विषयांऐवजी जास्तीत जास्त ५ विषयांमध्ये बसता येईल.
* परीक्षा केंद्रांची संख्या कमी करणे.
* CUET UG 2025 मधील परीक्षा केंद्रांची संख्या भारतात 354 वरून 285 आणि परदेशात 26 वरून 15 पर्यंत कमी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही परीक्षा परदेशातील २६ शहरांमध्ये घेण्यात आली होती.
* एकसमान परीक्षेचा कालावधी, CUET UG 2025 मधील सर्व परीक्षांसाठी 60 मिनिटांचा समान कालावधी निर्धारित केला आहे. पूर्वी हा कालावधी ४५ मिनिटांपासून ६० मिनिटांपर्यंत होता. प्रत्येक चाचणी पेपरमध्ये ५० प्रश्न असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ५ गुण दिले जातील, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १ गुण वजा केला जाईल.
* सर्व प्रश्न अनिवार्य आहेत, CUET UG 2025 मध्ये पर्यायी प्रश्नांची पद्धत रद्द करण्यात आली आहे. आता सर्व प्रश्न अनिवार्य असतील. गेल्या वर्षी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत ५० पैकी ४० अनिवार्य प्रश्न होते आणि सामान्य परीक्षेत ६० पैकी ५० प्रश्न होते (१० प्रश्नांच्या पर्यायासह). आता सर्व प्रश्न अनिवार्य असतील.