'वाडिया सबसे बढिया...' विद्यार्थ्यांनी का दिल्या घोषणा
या वर्षीही विजयी झाल्यावर विद्यार्थ्यांनी 'वाडिया सबसे बढिया...' अशा घोषणा देता परिसर दणाणून सोडला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने संगमनेर येथील डी. जे मालपाणी आणि बी.एन. सारडा महाविद्यालय (D.J Malpani and B.N. Sarada College)येथे विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव "जल्लोष - २०२४" स्पर्धा (Youth Festival "Jallosh - 2024" Competition)आयोजित करण्यात आली होती. त्यात नौरोसजी वाडिया कॉलेजने (Nowrosji Wadia College)सलग दुसऱ्या वर्षी सर्वसाधारण गटात विजेते होण्याचा बहुमान पटकावला. तसेच याच वर्षी विद्यापीठाने सुरू केलेल्या जल्लोष सुपरस्टार या महत्त्वाच्या परितोषकाचा पहिला मानकरी होण्याचा बहुमान महाविद्यालयाचाच विद्यार्थी साहिल भट (student sahil bhat)याने मिळविला. गेल्या वर्षी असाच बहुमान विद्यापीठाने सुरु केलेल्या 'गोल्डन बॉय' व गोल्डन गर्ल पारितोषिकांचे पाहिले मानकरी होण्याचा सन्मान महाविद्यालयाचे विध्यार्थी अनुक्रमे पृथ्वीराज देशमुख आणि संध्या बेलके यांनी मिळविला होता. या वर्षीही विजयी झाल्यावर विद्यार्थ्यांनी 'वाडिया सबसे बढिया...' अशा घोषणा देता परिसर दणाणून सोडला.
या स्पर्धेत नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय सुगम गायन, लोकवाद्यवृंद, तालवाद्य, पश्चिमात्य गायन ( एकल), पश्चिमात्य समूह गायन, पश्चिमात्य वाद्यवादन, आणि प्रश्नमंजुषा या स्पर्धेत बक्षिसे प्राप्त केली. याबद्दल मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. सचिन सानप व डॉ. अशोक चांडक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार, उपप्राचार्य डॉ. समिना बॉक्सवाला व डॉ.भारत बहुले, प्रबंधक राजेंद्र तागडे यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. हनुमंत लोखंडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एम. एस. पांढरपट्टे, डॉ कोमल सावंत, डॉ. मिलिंद नरवडे, प्रा. जयंत साळवे, डॉ. पद्मिनी माने, डॉ. अभिजय वाघमारे, प्रा. नम्रता जहागीरदार, डॉ राजेंद्र यादव, डॉ. विकास जाधव, डॉ आत्माराम आंधळे, डॉ कांचन फाटक, डॉ सचिन कांबळे, प्रा. परवेझ बागवान, प्रा. विद्या खाडे, डॉ. नागनाथ भुसणार, प्रा. अक्षय सोनावणे इतर सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.