हवाई दलाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
उमेदवारांच्या निवडीची अंतिम यादी लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे तयार केली जाईल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतीय हवाई दलाने (IAF) सामायिक पात्रता चाचणीचा (AFCAT 02/2024) निकाल जाहीर (Results announced) केला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार (Candidates) https://afcat.cdac.in/AFCAT/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. हवाई दलाची AFCAT 2 परीक्षा (Exam) 9 ते 11 ऑगस्ट 2024 या दरम्यान घेण्यात आली होती. निकाल तपासण्यासाठी, तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करावे लागेल.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना हवाई दल निवड मंडळाच्या (AFSB) मुलाखतीच्या फेरीत उपस्थित राहावे लागेल. उमेदवारांच्या निवडीची अंतिम यादी लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे तयार केली जाईल.
हवाई दलाच्या AFCAT 2 द्वारे, विंग आणि ग्राउंड ड्युटी शाखेतील अधिकारी पदावर भरती केली जाते. ज्यामध्ये तांत्रिक आणि गैर-तांत्रिक अशा दोन्ही शाखांचा समावेश आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुढील वर्षापासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाईल. ज्यामध्ये फ्लाइंग ब्रांच आणि ग्राउंड ड्युटी (तांत्रिक आणि नॉन-टेक्निकल) या शाखांमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन उपलब्ध असेल.
* AFCAT 2 2024 चा निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in ला भेट द्या.
* 'AFCAT 02/2024 निकाल या लिंकवर क्लिक करा.
* आता तुमचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला दिलेला कॅप्चा कोड भरून साइन इन करावे लागेल.
* यानंतर स्क्रीनवर निकाल उघडेल जिथून तुम्ही तो तपासू शकता आणि डाउनलोड करू शकता.