अण्णासाहेब मगर महाविद्यालयास विद्यापीठाचा जगन्नाथ राठी पुरस्कार

या पुरस्काराचे वितरण विद्यापीठाच्या वर्धापनदिनी येत्या सोमवारी दि. १० फेब्रुवारी रोजी विद्यापीठात होणार आहे.

अण्णासाहेब मगर महाविद्यालयास विद्यापीठाचा जगन्नाथ राठी पुरस्कार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयास (Annasaheb Magar College) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (Savitribai Phule Pune University) जगन्नाथ राठी पुरस्कार (Jagannath Rathi Award )जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण विद्यापीठाच्या वर्धापनदिनी येत्या सोमवारी दि. १० फेब्रुवारी रोजी विद्यापीठात होणार आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात कौशल्य  विकास कार्यशाळा, विवाहपूर्व समुपदेशन, महिला सक्षमीकरण, छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम, मूल्य शिक्षण कार्यशाळा, संविधान दिन, कवी समेलन, मानवी हक्क कार्यशाळा, संशोधन पद्धती,  एफडीपी - शिक्षण पद्धतीचा प्रभाव, ग्राम सर्वेक्षण  इत्यादी  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.महाविद्यालयाचे उपप्राचार्य  डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. संगीता देवकर , डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. नाना झगडे, डॉ. गणेश गांधीले, यांनी या सर्व कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुखमंत्री अजितदादा पवार, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदीप कदम, खजिनदार  मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.